फॉर्म नं – ८ रहिवाशाचे स्थलांतर कळवण्यासाठी / विद्यमान मतदार यादीतील नोंदीची दुरुस्त करण्यासाठी /मतदार ओळखपत्र बदलून देणे / दिव्यांग म्हणून चिन्हांकित करणे यासाठी मतदार अर्ज नमुना – ८ pdf उपलब्ध voter nondi durusti application form pdf available
फॉर्म नं – ८ रहिवाशाचे स्थलांतर कळवण्यासाठी / विद्यमान मतदार यादीतील नोंदीची दुरुस्त करण्यासाठी /मतदार ओळखपत्र बदलून देणे / दिव्यांग म्हणून चिन्हांकित करणे यासाठी मतदार अर्ज नमुना – ८ pdf उपलब्ध pdf download
अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना
नमुना ८
१. साधारण सूचना
(अ) नोंदणीकृत / मतदार यादीतील मतदाराकडून रहिवासाचे स्थलांतरण, किंवा विद्यमान नोंदीची दुरुस्ती करण्यासाठी, किंवा इमतदार ओळखपत्र बदलून देण्यासाठी, किंवा दिव्यांग व्यक्ती म्हणून चिन्हांकित करण्यासाठी अर्ज करता येईल.
(ब) जर रहिवासाचे स्थलांतर किंवा नोंदीची दुरुस्ती आणि कोणत्याही सुधारणेशिवाय मतदार ओळखपत्र बदलून देणे यासाठी केलेला अर्ज मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडून मंजूर केला तर अर्जदाराला नवीन मतदार ओळखपत्र पाठवण्यात येईल आणि त्याने आपले जुने मतदार ओळखपत्र हे मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे तात्काळ परत करणे आवश्यक आहे.
२. बाब क्र. (१) (अर्जदाराचे नाव) अर्जदाराने त्याचे नाव, इपीक क्रमांक, आधार क्रमांक आणि स्वतःचा किंवा नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक आणि ई मेल पत्ता नमूद करेल. नोंदींच्या प्रमाणिकरणासाठी आधार क्रमांक नमूद करावा. जर अर्जदाराकडे आधार क्रमांक नसेल तर तसे I (b)
मध्ये नमूद करावे.
३. बाब क्र. (२) (अर्जातील पर्याव) अर्जदाराने अर्ज करण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी एका पर्यायासमोर खूण करावी आणि संबंधित जागी त्यासंबंधीचे तपशील भरावेत. बाकी सर्व भाग जे गैरलागू आहेत ते खोडावेत.
४. रहिवासाचे स्थलांतरणासाठी अर्ज
(अ) अर्जदाराचा नवीन पत्ता असलेल्या ठिकाणच्या ज्या मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज केला पाहिजे.
(ब) अर्जदाराने पत्ता जिथे तो. गेला आहे आणि सध्या राहत आहे तो नमूद केला पाहिजे आणि नमूद केलेल्या कागदपत्रांपैकी कोणत्याही एका कागदपत्राची स्वप्रमाणित प्रत पत्त्याचा पुरावा म्हणून सोबत जोडली पाहिजे. ते कागदपत्र त्याच्या स्वतःच्या किंवा पालकांच्या किंवा जोडीदाराच्या नावावर असेल तरी चालेल. अर्जदाराने जे कागदपत्र पत्त्याचा पुरावा म्हणून सादर केले असेल त्यासमोर खूण केली पाहिजे. इतर कागदपत्रामुळे सेवा जलद दिली जाईल. जर नमूद केलेल्या कागदपत्रांपैकी त्याच्याकडे कुठलेच कागदपत्र नसेल तर, त्याने पत्त्याचा पुरावा म्हणून जे कागदपत्र सादर केले असेल ते मोकळ्या जागेत नमूद करावे.
५. विद्यमान मतदार यादीतील नोंदी दुरुस्त करण्यासाठी अर्ज
(अ) जर अर्जदाराला मतदार यादीतील कुठलीही विद्यमान नोंद दुरुस्त करायची असेल, त्याने योग्य चौकटीत खूण केली पाहिजे आणि त्याच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ संबंधित कागदपत्र सादर केले पाहिजे. दिलेल्या मोकळ्या जागेत सादर केलेल्या कागदपत्राचे नाव स्पष्टपणे नमूद करावे….
(ब) जर अर्जदाराला त्याचे छायाचित्र बदलायचे असेल तर त्यानेनजीकच्या काळातील समोरच्या बाजूने संपूर्ण चेहरा दिसेल असे पांढऱ्या पार्श्वभूमीवरचे पासपोर्ट साईझ रंगीत छायाचित्र ४.५ सेंमी. ३.५ सेंमी., दिलेल्या जागी चिकटवावे.
६. कुठल्याही दुरुस्तीशिवाय मतदार ओळखपत्र बदलून देण्यासाठी अर्ज
इपीक बदलण्यासाठी अर्जदार योग्य चौकटीत खूण करेल आणि त्याचा फाटलेला / जुना मतदार ओळखपत्र परत करेल. (किंवा यासोबत मतदार ओळखपत्र हरवल्याचा प्रथम चौकशी अहवाल किंवा पोलीस अहवालाची प्रत जोडेल.
७. प्रतिज्ञापत्र- अर्जदाराने ” प्रतिज्ञापत्रात” हे घोषित केले पाहिजे की अर्जात नोंदवलेली तथ्ये आणि तपशील त्याच्या समजुतीनुसार आणि विश्वासानुसार
बरोबर आहेत.
वा अर्जासंदर्भात ” प्रतिज्ञापत्रातील” कुठलीही नाँद चुकीची आढळल्यास किंवा चुकीची असल्यास किंवा बरोबर नसल्यास, त्यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार (१९५० च्या ४३ नुसार) दंडाची तरतूद आहे आणि एक वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात कृपया याची नोंद घेणे.









