राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत व्यावसायिक व अव्यावसायिक विद्यमान विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकाबाबत students hostel scheme circular
संदर्भ:-
१) या कार्यालयाचे पत्र क्र. ६०१२ दि.१९.१०.२०२६
२) या कार्यालयाचे पत्र क्र. ६३३३ दि.०२.११.२०२६
उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भ क्र. १ पत्रान्वये राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत व्यावसायिक व अव्यावसायिक विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी दि.३०.१०.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सदरील प्राप्त अर्जाची छाननी (SCRUTINY) करुन दि.१३.११.२०२६ पर्यंत पहिली निवड यादी प्रसिध्द करणेबाबत कळविण्यात आले आहे.
तसेच संदर्भ क्र. २ पत्रान्वये शासकीय वसतीगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी नियमित (EXISTING) विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी दि.१३.११.२०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती.
तरी आपणास सुचित करण्यात येते की, शासकीय वसतीगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी नियमित (EXISTING) विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी दि. २५.११.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.










