खाजगी विद्यार्थी (Private Candidate) नावनोंदणी अर्ज मुदतवाढ private candidate registration application
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४ विषय-खाजगी विद्यार्थी (Private Candidate) नावनोंदणी अर्ज मुदतवाढ
प्रकटन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं १७ भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
इ १० वी व इ १२वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे तसेच अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा
फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) अतिविलंब शुल्काने सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
1. खाजगी विद्यार्थ्यांनी इ. १० वी व इ. १२वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन (online) पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन (offline) अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
2. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरवात करावी. या संदर्भात अधिक माहितीसाठी शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
3. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता १) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र २) आधारकार्ड ३) स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो स्वतःजवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरतांना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत.
4. पात्र (Eligible) विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) ऑनलाईन देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी. तसेच पात्र (Eligible) विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे (Examination Form) मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत (दि.३०/११/२०२६ पर्यंत) परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे व आवेदनपत्रे भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संबंधित माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाकडून परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी.
5. फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी अर्ज करण्यासाठी यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.











