दि.०१.१०.२०२६ रोजीपासून महिला प्रवाशांना करण्यात आलेल्या NCMC कार्ड अनिवार्यतेच्या शिथिलतेबाबत ncmc card circular
संदर्भ – पत्र क्र. राप/वाह/एनसीएमसी कार्ड/५६७१, दि.२८.०९.२०२६
जेष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना रा.प. महामंडळात सवलतीचे तिकीट प्राप्त करण्यासाठी दि. ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी पासुन NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येत असल्याचे या कार्यालयाचे वरील संदर्भिय पत्राद्वारे आपणांस कळविण्यात आले आहे.
महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या पाहता अद्याप पर्यंत फक्त १.१० कोटी NCMC कार्ड नोंदणी /वितरीत झाली आहेत. यामध्ये गाव खेड्यातील महिलांना माहिती अभावी अद्यापपर्यंत मोठ्या प्रमाणात नोंदणी केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिला लाभार्थ्यांना रा.प प्रवासभाडे सवलतीकरिता अनिवार्य करण्यात आलेली NCMC कार्ड ची अट दि.०७.११.२०२६ रोजीपासून दि.३१.१२.२०२६ रोजीपर्यंत शिथिल करण्यात येत आहे. या कालावधीत सर्व महिला लाभार्थ्यांनी सदरचे NCMC कार्ड नोंदणीकरण करण्याचे आवाहन आपणामार्फत करण्यात यावे.
सबब, सदर महिलांना कार्ड नोंदणी व वितरीत करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरापर्यंत जाऊन विशेष शिबिरे राबवून कार्ड नोंदणीकरण व वितरण करण्यात यावे. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना, ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा सक्रिय सहभाग घेऊन सदर शिबिरे आयोजित करुन दि.३१ डिसेंबर २०२६ अखेर पर्यंत १०० टक्के NCMC कार्ड नोंदणीकरण व वितरणाची कार्यवाही करण्यात यावी.











