समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन २०२५ २६ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) मधील संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT २) च्या आयोजनाबाबत pat exam niyatkalik mulyankan chachani
संदर्भ : १. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पा.चा. जिल्हा पत्र/२०२५-२६/SCERT ३८.०/२९/२०२५ § EVALUATION/१/१३१९४६९/२०२५ दिनांक ०९/०७/२०२५.
२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं.चा.-१ जिल्हा पत्र/२०२५-२६/SCERT ३८.०/७२/२०२५ – EVALUATION /१/१४४२६७३/२०२५ दिनांक २३/०९/२०२५.
उपरोक्त संदर्भ क्र. २ अन्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येत आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी -१ चे आयोजन दि.१० ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत करण्यात येत आहे.
सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी एकूण दहा माध्यमात घेण्यात येणार असून संकलित चाचणी १ करीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचणी पत्रिका राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत पुरविण्यात येत आहेत.
इयत्ता २ री ते ८ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी-१ लेखी, तोंडी, स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळास्तरावरून नियोजन करण्याबाबत कळविण्यात यावे. कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-१ होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.












