इ. १२ वी फेब्रु मार्च २०२६ परीक्षेच्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यास मुदतवाढीबाबत hsc exam avedanpatra
संदर्भ:
१. शासन पत्र क्रमांकः परीक्षा-१६२५/प्र.क.१३/ एसडी-२, दि.०३/१२/२०२८
२. या कार्यालयाचे पत्र क.ग.मं/परीक्षा-८/४१३९, ४१४० दि. ०५/१२/२०२५
३.क.ग.मं./ परीक्षा-३/३३८ दि. २६/०१/२०२६ रोजीचे पत्र
४. शासनाचे पत्र क. परीक्षा-१६२६/प्र.क.०६/ एस डी-२ दि. २९/०१/२०२६
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, संदर्भिय क. १ च्या शासन पत्राच्या अनुषंगाने फेब्रु-मार्च २०२६ च्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची अंतिम मुदत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेसाठी दि.२१/०१/२०२६ पर्यंत विभागीय मंडळांना कळविण्यात आलेली होती.
इ. १२ वी परीक्षेसाठी आवेदनपत्र भरण्याची मुदत दि.२१/०१/२०२६ रोजी संपलेली आहे. याबाबत सदर आवेदनपत्र भरणेसाठी मुदतवाढ मिळणेबाबत विभागीय मंडळ कार्यालयांतर्गत अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी मंडळाकडे विनंती केली आहे.
त्यानुसार संदर्भिय क.३ च्या पत्रानुसार मुदतवाढीबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता याबाबत शासनाकडून प्राप्त संदर्भिय क. ४ च्या पत्रानुसार फेब्रु-गार्च २०२६ च्या इ. १२ वी परीक्षेसाठी आवेदनपत्रे अतिविशेष अतिविलंब शुल्कासह दि. ०३/०२/२०२६ पर्यंत स्विकारण्यात यातीत.
याबाबत सर्व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे.
(मा. अध्यक्ष यांचे मान्यतेने)










