पदोन्नतीकरिता टीईटी अर्हता धारण करणाच्या अनुषंगाने दाखल न्यायालयीन प्रकरणांबाबत promotion teacher eligibility test circular
संदर्भः-संबंधित अतिरिक्त सरकारी वकील, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचा दुरध्वनी संदेश.
महोदय,
जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या पदोन्नतीकरिता टीईटी (TET) अर्हतेच्या अनुषंगाने पदोन्नती प्रक्रिया राबविण्याबाबत जिल्हा परिषदांनी केलेल्या कार्यवाहीबाबतची माहिती खालील विवरणपत्रात सादर करण्यात यावी.

२. सदर विभागनिहाय एकत्रित माहिती मा. उच्च न्यायालयातील प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांमध्ये शासनाची बाजू मांडण्यासाठी तातडीने आवश्यक असल्याने, सर्वोच्च प्राधान्य देऊन कोणताही विलंब न करता उद्या दि.२७.११.२०२६ रोजी दुपारी १२:०० पर्यत शासनास सादर करण्याची आपणांस विनंती आहे.










