“शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या मुलाखतीसह फेरीतील शिफारशीसाठी मुदतवाढ देण्याबाबत shikshak abhiyogyata buddhimatta test circular
दिनांक : २५/११/२०२६
नियुक्ती प्राधिकारी/व्यवस्थापनांसाठी सूचना
“शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या मुलाखतीसह फेरीतील शिफारशीसाठी मुदतवाढ देण्याबाबत.
१. मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी मुलाखतीसह फेरीतील १०,३२८ रिक्त जागांवर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी २७,१५४ प्राधान्यक्रमावर शिफारस झालेल्या उमेदवारांची नियमित फेरी (Regular Round) सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक ३१/१०/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
२. सदर निवडप्रक्रियेतील मुलाखत व अध्यापन कौशल्याची कार्यवाही दिनांक ३/११/२०२६ ते २५/११/२०२६ या कालावधीमध्ये घेण्यावावतचे नियोजन उमेदवार प्राप्त झालेल्या शैक्षणिक व्यवस्थापनांना दिनांक ३१/१०/२०२६ रोजीच कळविण्यात आलेले आहे. यावावत नियुक्ती प्राधिकारी यांचेस्तरावरून कार्यवाही सुरु झाली आहे.
३. तथापि, नियुक्ती प्राधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे स्तरावरील कार्यवाही पूर्ण न झाल्याने दिनांक १२/१२/२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
४. गुणांकनासाठी आवश्यक अर्हतेच्या नोंदी चुकीच्या नोंद झाल्या असतील तर योग्य मूल्यमापन होण्यासाठी संबंधित व्यवस्थापनाने पुराव्यासह पवित्र प्रणालीच्या ऐवजी edupavitra२०२५@gmail.com edupavitra२५@gmail.com या ई-मेल वर तत्काळ ई-मेल करावेत. जेणेकरून उमेदवारांचे योग्य मुल्यमापन करून निवड प्रक्रिया पूर्ण करता येईल. कोणत्याही परिस्थतीतीत चुकीची नोंद दुर्लक्षित करू नये.
५. व्यवस्थापनांना काही अडचणी आल्यास edupavitra२५@gmail.com या email वर संपर्क साधता येईल.










