प्राथमिक शिक्षकांकरिता (इ.१ली ते ८वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत teacher eligibility test
संदर्भ: शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: एसएसएन-२०१६/प्र.क्र.३०/१६/टीएनटी-२, दिनांक ३०.६.२०१६
विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये विस्तृत सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि रिट याचिका क्र.१८२९/२०११ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दि.१४.१०.२०१३ दिलेल्या निर्देशानुसार ३१३९ उमेदवारांना संदर्भाधीन शासन परिपत्रकातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण करण्याबाबतच्या अटीमधून वगळण्यात आले आहे याची कृपया नोंद घ्यावी व त्याप्रमाणे संबंधितांना अवगत करण्यात यावे.











