छत्रपती संभाजीनगर विभागात क्षमा दिवस साजरा करणे बाबत kshama divas sajara paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

छत्रपती संभाजीनगर विभागात क्षमा दिवस साजरा करणे बाबत kshama divas sajara paripatrak 

संदर्भ

श्री. वैभव महावीर काला, प्रदेश सचिव, अल्पसंख्यांक मोर्चा, महाराष्ट्र यांचे निवेदन दिनांक २९.०८.२०२५

महोदय,

उपरोक्त विषयांकित प्रकरणी श्री. वैभव महावीर काला यांचे निवेदन या कार्यालयात प्राप्त झाले आहे.

सदर निवेदनामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी क्षमा दिवस हा वर्षातुन एकदा साजरा केला जातो. त्यामुळे समाजातील एकसंघतेची जाणीव पुन्हा जागृत होऊन बंधुभावाची मनीषा दृढ होते आणी समाजाचे ऐक्य बळकट होते. नवीन शैक्षणीक धोरण २०२० मधील मुद्दा क्र. ४.२८ नुसार क्षमा हा मानवीं घटनात्मक मूल्य असुन भारताची नैतिकता मुल्ये संस्कृतो वारसा ज्ञान सभ्यता अभियान रुजवणे गरजेचे आहे. क्षमा दिवस समाजातील सलोखा आणी शांती निर्माण करण्याचे महत्व दर्शवतो. या वर्षी हा दिवस ८ सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. तरी छत्रपती संभाजीनगर विभागात क्षमावाणी दिवस साजरा करावा, अशी विनंती केली आहे.

प्राप्त संदर्भिय निवेदनाची छायाप्रत नियमोचित कार्यवाहीसाठी या सोबत देण्यात येत आहे.

सोबतः- संदर्भिय निवेदनाची छायाप्रत सहपत्रासह

मा. विभागीय आयुक्त यांचे पृष्ठांकनानुसार।

“क्षमावाणी दिवस”

दि.०८ सप्टेंबर २०२५, सोमवार

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. जीवन जगताना व्यक्तीला क्रोध, मान, माया, लोभ, तसेच प्रेम, आपुलकी, स्नेह, बंधुता, इत्यादी भावना असतात. यातील क्रोध, मान, माया, लोभ हे आपल्यासाठी हानीकारक तर प्रेम, आपुलकी, स्नेह, बंधुता हे हितकारक आहे. यापैकी ‘क्रोध’ हा विनाशकारक आहे. आपल्या मनासारखे व अपेक्षेप्रमाणे न घडल्याने क्रोध उत्पन्न होतो. क्रोध हा क्षणिक असतो व त्यातून घातपात आपल्या हातून घडण्याची शक्यता असते तसेच दीर्घकालीन क्रोधातून वैरत्व भाव उत्पन्न होतो आणि तो व्यक्तीच्या आत्मा, शरीर, कुटुंब, समाज आणि देशासाठी अपायकारक ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

क्रोध, राग, संताप, यावर विजय मिळवायचा असेल तर त्याला “क्षमा मागणे आणि क्षमा करणे हा उपाय आहे. ” आणि त्यामुळेच क्रोधाच्या अभावाला ‘क्षमा’ म्हणतात.

प्रत्येक व्यक्तीचे विचार हे भिन्न-भिन्न असतात, मत मतांतरे असतात आणि याच विचार भिन्नतेमुळे आपल्या कडून इतर व्यक्ती दुखावल्या जातात. अशा दुखावलेल्या व्यक्ती आपल्यापासून दूर जातात व विचलित होऊन ते आपल्या दैनंदिन कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, याचा परिणाम त्याच्या सभोवतालच्या व्यक्तींवर, कुटुंबावर व पर्यायाने त्यांच्या आरोग्यावर सुध्दा होतो. यामध्ये काही व्यक्ती “डिप्रेशन” मध्ये सुद्धा जातात. डिप्रेशनमुळे अनेकजण आयुष्यात चुकीचे निर्णय घेतात व त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते.

त्यामुळे दैनंदिन जीवनात आपल्याकडून कोणीही दुखावले जाणार नाही याची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे, तसेच आपल्या वर्तनातून, वाणीद्वारा, कृतीद्वारा कोणी दुखावल्या गेल्यास मोठ्या मनाने आपण त्यांची माफी मागितली पाहिजे त्यामुळे आपले मन हलके होते व समोरच्या व्यक्तीसोबत प्रेम, मैत्री व आपलेपणाची भावना निर्माण होण्यास मदत होते.

माफी मागायच्या वेळेस आपल्या मनातील भावना?

माफी मागणे हे कमीपणाचे लक्षण आहे; मी माफी मागितली तर माझा पराजय झाला किंवा मी समोरच्या पेक्षा कमकुवत भासू लागलो; पण याच अहंकारने आपण माफी मागत नाही. “अहंकार हे दुर्बलाचे लक्षण आहे” त्यामुळे माफी मागणारा हा नेहमी ‘वीर’ म्हणूनच संबोधला जातो. म्हणूनच म्हणतात “क्षमा विरस्य भूपषम्” करिता अहंकार सोडून लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, वरिष्ठ-कनिष्ठ भेदभाव न करता माफी मागितली पाहिजे व आपण इतरांनाही माफ केले पाहिजे.

माफी कोणाची मागावी?

माफीचे स्वरूप फकत मानवजाती पुरतेच मर्यादित नसून ती प्राणिमात्रांसाठी आहे. जेव्हा आपण मुक्या पशुपक्ष्यांना दुखावतो तेव्हा त्यांचीही आपण मनातून, कृतीतून, माफी मागितली पाहिजे. मूक, हिंसक प्राणी सुद्धा आपल्याला प्रेम देतात, हिंसक भाव विसरतात. अर्थात क्षमेचे स्वरूप मर्यादित न ठेवता सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी आहे.

आपण माफी मागितल्याने आपल्यावर काय परिणाम होतो?

आपल्यावर सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे आपले मन हलके होते, मनाची प्रसन्नता वाढते, नाते संबंध सुधारतात आणि हे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक आहे.

आपण कोणाला का माफ करावे ?

आपण कोणाला माफ करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीवर कृपा करणे नव्हे तर स्वतःच्या मनावर असलेले दडपण कमी करून मनावर असलेल्या भारापासून मुक्ती मिळविने होय. माफ केल्याने नव्याने स्नेह ऋणानुबंध अंकुरण्यास सुरवात होते. जसे की साधू संत आणि यशस्वी व्यक्तींच्या स्वभावात समता, करुणा, सेवा, दया, शांती आणि संयमी भाव असतो कारण त्यांनी आपल्या स्वभावात क्षमा भाव धारण केलेला असतो. “जगातील सर्व धर्म हे माफी मागणे आणि माफ करण्याचा संदेश देतात.” आपण सुद्धा क्षमा स्वभाव धारण केल्यास आपले जीवन शांती व सुखमय होईल. कारण क्षमा हा आत्म्याचा स्वभाव आहे.

आनंदी राहण्यासाठी आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल स्वतःला माफ करणे गरजेचे असते, कारण अनेक चुकांसाठी स्वतः पश्चाताप आणि त्यातूनच आत्मघात करण्यापर्यंत टोकाचे विचार आपल्या मनात येत असतात त्यासाठी प्रत्येक व व्यक्तीने क्षमाभाव धारण करणे गरजेचे आहे. आजच्या क्षमावाणीची सुरवात स्वतः केलेल्या चुकांबद्दल स्वतःला माफ करून करूया.

क्षमावाणी दिवशीच क्षमा मागणे म्हणजे क्षमा नव्हे तर क्षमा भाव आयुष्यभरासाठी आपला स्व-भाव झाला पाहिजे. अबालवृद्ध सर्वांनी क्षमा भाव प्रसारित करण्याच्या हेतूने क्षमावाणी दिवस साजरा करणे व सर्वांनी एकमेकांशी केलेल्या चुका आणि दुखांबद्दल माफी मागण्यासाठी, क्षमा करण्यासाठी क्षमादिवस हा उपक्रम राबवला जात आहे.

चला तर मग आपण आपल्याकडून जाणते अजाणतेपणी झालेल्या चुकांबद्दल माफी मागूया व माफ करूया.

सोबतच आपले आई, वडील, भाऊ, बहिण, नातेवाईक, शेजारी, शिक्षक, मित्र, वरिष्ठ / कनिष्ठ सहकारी आणि इतरांची क्षमा मागून आज क्षमावाणी दिवशी आपला कंठ मोकळा करून आपल्या मनाला हलके करूया.

Related posts:

Leave a Comment