जिल्हा परिषदा व पंचायत समित्याच्या निवडणूकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या व त्यांच्यावर कामाची जबाबदारी सोपविणेबाबत sthanik swarajya sanstha nivadnuka shasan paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषदा व पंचायत समित्याच्या निवडणूकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या व त्यांच्यावर कामाची जबाबदारी सोपविणेबाबत sthanik swarajya sanstha nivadnuka shasan paripatrak 

शासन निर्णय pdf download

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे अधिक्षण, संचालन व नियंत्रण यांची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग व निवडणूक घेणे) नियम, १९६२ व महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण व निवडणूक घेणे) नियम, १९६२ मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषदा व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज पार पाडण्यात येते;

आणि ज्याअर्थी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया कर्तव्यदक्ष व निःपक्ष अधिकारी यांच्याद्वारे हाताळण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाचे दि. १६/०७/२०२५ रोजीच्या आदेशान्वये निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणुकीशी संबंधित इतर कामासाठी अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी सूचना निर्गमित केल्या आहेत;

शासन निर्णय pdf download

आणि त्याअर्थी आता, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ९-अ (४) नुसार मिळालेल्या प्राप्त अधिकारांचा वापर करून तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग व निवडणूक घेणे) नियम, १९६२ मधील नियम ३ व ४ आणि महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण व निवडणूक घेणे) नियम, १९६२ मधील नियम ५ व ६ मधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीशी संबंधित इत्तर कामासाठी अधिकारी यांच्या नियुक्त्या व त्यांच्यावर कामाची जबाबदारी सोपविण्यासंदर्भात खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत:-

१) जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पुढीलप्रमाणे नेमावेत:-

ⅰ) प्रत्येक पंचायत समिती क्षेत्रासाठी तसेच त्या क्षेत्रातील जिल्हा परिषद निवडणूक विभागांच्या निवडणुकीसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात यावा.
i) प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याबरोबर एक किंवा आवश्यकतेनुसार अधिक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नेमावेत.

२) जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्राधान्याने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. एखाद्या जिल्ह्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार संवर्गातील अधिकारी आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध नसतील तर संबंधित महसूल विभागातील इतर जिल्हयांमधून आवश्यक अधिकारी उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित विभागीय आयुक्त यांनी कार्यवाही करावी. याकरिता विभागीय आयुक्त यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांची विभागातील आवश्यकता व उपलब्धता यांचा आढावा घ्यावा. परंतु अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या विभागात पुरेशा प्रमाणात उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी उपलब्ध नसतील तर त्या ठिकाणी निवडणुकीचा अनुभव असलेले तहसिलदार संवर्गातील अधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करता येईल, अशा वेळेस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसिलदार यांची नेमणूक करावी. अशा उपरोक्त अपवादात्मक परिस्थितीत ज्या उपविभागात एकापेक्षा जास्त तालुके आहेत अशा उपविभागाच्या बाबतीत उपविभागाच्या मुख्यालयाच्या तालुक्याला तहसिलदाराची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करावी व उपविभागातील इतर एका तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करावी.

शासन निर्णय pdf download

३) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम व निवडणूक नियमातील तरतुदी तसेच राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले आदेश, सूचना व परिपत्रकातील तरतुदीनुसार निवडणुकीचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी राहील,

४) निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नेमताना विभागीय आयुक्त यांनी राज्य निवडणूक आयोगाने दि. १६/०७/२०२५ रोजी दिलेल्या आदेशातील निकषांचे कटाक्षाने पालन करणे बंधनकारक राहील. यासाठी विभागीय आयुक्त यांनी खालील बाबींची खात्री करावी :-

1) संबंधित अधिकारी उत्कृष्ट, संशयातित सचोटी व निःपक्षपातीपणे काम करणारे असावेत. त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर संबंध नाहीत याची खात्री करावी. ii) सदर अधिकाऱ्यांना आवश्यक असे योग्य व पुरेसे प्रशिक्षण द्यावे.

५) निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी यांना उपजिल्हाधिकारी व तहसिलदार संवर्गातील अधिकारी उपलब्ध करुन देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागीय आयुक्त यांची राहील. मात्र त्यांच्या नेमणुकीचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी निर्गमित करतील.
६) निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवडणूक विषयक सर्व कामे पार पाडताना सहाय्य करण्यासाठी आवश्यक त्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती करावी.

शासन निर्णय pdf download

(७) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी यांची कोणतीही कामे पार पाडू शकतील. परंतु नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्याशी संबंधित असलेल्या कामापैकी कोणतेही काम पार पाडण्यास, निवडणूक निर्णय अधिकारी अनिवार्य अशा परिस्थितीमुळे असमर्थ झाला नसेल तर कोणताही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उक्त नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्याशी संबंधित असलेल्या कामापैकी कोणतेही काम पार पाडणार नाही.

८) जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकारी हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील. सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक तसेच निवडणुकीशी संबंधित इतर सर्व अधिकारी व कर्मचारी हे निवडणूक अधिकारी यांच्या म्हणजेच जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रण आणि पर्यवेक्षणाखाली काम करतील.

९) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक/पोटनिवडणुका निर्भयपणे, मुक्त वातावरणात व पारदर्शकरित्या पार पाडल्या जाव्यात, यादृष्टीने जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांनी नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही निवडणुकीची अधिसूचना निर्गमित होण्यापूर्वी संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी. मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,

शासन निर्णय pdf download

Related posts:

Leave a Comment