समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ सुधारीत प्रसिद्धी निवेदनाबाबत kendrapramukh exam
महोदय,
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी ९., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -२०२५” चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने माहे जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२६ मध्ये करण्यात येत असून, परीक्षेसंदर्भातील प्रसिद्धी निवेदन यासोबत जोडलेले आहे.
सदर प्रसिध्दी निवेदन आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.










