शाळा व्यवस्थापन समिती शासन निर्णय,पुनर्गठण प्रक्रिया टप्पे, रचना व कार्य, सर्व विषय, तक्ता pdf स्वरूपात उपलब्ध school management committee shasan nirnay
⭕शाळा व्यवस्थापन समिती मार्गदर्शक सूचना परिपत्रक pdf download
⭕शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण शासन निर्णय pdf download
⭕ शाळा व्यवस्थापन समिती दिनांक 09-11-2020 चा शासन निर्णय pdf download
⭕ शाळा व्यवस्थापन समिती सर्व विषय pdf download
⭕ शाळा व्यवस्थापन समिती संकलन शासन परिपत्रक pdf download
⭕ शाळा व्यवस्थापन समिती तक्ता pdf download
⭕ शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठण करण्याबाबतचे परिपत्रक pdf download
⭕ शाळा व्यवस्थापन समिती रचना व कार्य pdf download
⭕ शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रियेचे टप्पे pdf download
⭕ शाळा व्यवस्थापन समिती दिनांक 17/06/20210 चा शासन निर्णय pdf download
RTE Act 2009 नुसार शाळा व्यवस्थापन समितीचे (SMC) पुनर्गठन / पुनर्रचना करणे बाबत…….
संदर्भ :- १. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९
२. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत शासन निर्णय क्र. संकीर्ण ११२५/प्र.क्र.२५१/२५ एसएम-१ दि.१६ एप्रिल २०२५
३. शासन निर्णय क्र. संकीर्ण ११२०/प्र.क्र.२६७/एसएम-१, ०९/११/२०२० ४. शासन निर्णय क्र. पीआरई २०१०/प्र.क्र. २१७/प्राशि १, १७/०६/२०१०
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, शाळा विकासामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचा सक्रीय सहभाग वाढवण्यासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील भाग ४, कलम २१ नुसार शाळा व्यवस्थापन समित्यांची रचना व गठन करणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ज्या शाळा व्यवस्थापन समितीला 2 वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांनी नव्याने समिती पुनर्गठन करावी व ज्या शाळांमध्ये व्यवस्थापन समितीची २ वर्षे पूर्ण झालेली नाहीत त्यांनी आवश्यकते नुसार पुनर्रचना करावी. उदा. कोणत्याही कारणाने SMC सदस्य यांचे पाल्य शाळा सोडून गेले असेल अशा सदस्यांचे सदस्यत्व रद्द होते. त्यामुळे आपल्या शाळेच्या शेवटच्या वर्गातील सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करून पहिलीत दाखल झालेल्या पाल्याच्या पालकांमधून पालक सभेद्वारे सदस्य निवड करणे आवश्यक आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करताना शासन निर्णयचा आधार घेऊन सर्व अटी व शर्थीचे पालन करावे, SCERT व DIET , कोल्हापूर च्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात मार्च २०२५ मध्ये तालुकास्तर शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षणे संपन्न झाली. यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले होते. तसेच अधिक मदतीसाठी शाळानिहाय SMC मार्गदर्शिका उपलब्ध करून देण्यात आली होती. SMC मार्गदर्शिका नुसार SMC चे पुनर्गठन / पुनर्रचना करण्यात यावी.
संदर्भ क्र. २ नुसार चालू शैक्षणिक वर्ष २०२५ २६ पासून शाळा स्तरावर सध्यस्थितीत कार्यरत असलेल्या समित्या मधील माता पालक संघ, शालेय पोषण आहार योजना समिती, पालक शिक्षक संघ, नवभारत साक्षरता समिती, तंबाखू सनियंत्रण समिती आणि SQAAF स्वयं मूल्यांकन समिती या सहा समित्यांचे शाळा व्यवस्थापन समिती मध्ये समाविष्ट / विलीन करण्यात आले आहे. तरी विलीन करण्यात आलेल्या समित्यांचे कामकाज यापुढे शाळा व्यवस्थापन समिती कडे असेल.
तरी आपल्या स्तरावरून सर्व शाळा मध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन / पुनर्रचना करण्याची कार्यवाही करण्यात यावी. याबाबतचा अहवाल कार्यालयास dietkop@gmail.com या ईमेल द्वारे दि. ३० जून २०२५ पर्यंत पाठवावा.
सोबत – समितीची रचना व कार्ये सोबत जोडली आहेत.
शाळा व्यवस्थापन समिती रचना, कार्ये व पुनर्गठन प्रक्रिया
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम २१ व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ मधील नियम १३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य राहतील. तथापि उपरोक्त प्रमाणे पासून शाळा स्तरावर सध्यस्थितीत कार्यरत असलेल्या समित्या मधील माता पालक संघ, शालेय पोषण आहार योजना समिती, पालक शिक्षक संघ, नवभारत साक्षरता समिती, तंबाखू सनियंत्रण समिती आणि SQAAF स्वयं मूल्यांकन समिती या ६ समित्यांचे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये विलीनीकरण केल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्ये पुढीलप्रमाणे :
शाळा व्यवस्थापन समितीची रचना
१. सदर समिती किमान १२ ते १६ लोकांची राहील (सदस्य सचिव वगळून)
२. यापैकी किमान ७५ टक्के सदस्य बालकांचे आईवडील/पालक यामधून असतील.
अ) पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल.
ब) उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकांतील बालकांच्या माता-पित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल.
क) साधारणपणे पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल या बाबत
खबरदारी सदस्य सचिवांनी घ्यावी.
३. उर्वरित २५ टक्के सदस्य पुढील व्यक्तींपैकी असतील,
अ) स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेली प्रतिनिधी – १
(स्थानिक प्राधिकरण सदर सदस्यांची निवड करतील)
ब) शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक – १
क) पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ञ / बालविकास तज्ञ १
४. वरील अ.क्र.२ मधील बालकांचे आईवडील / पालक सदस्यांमधून, समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करील, ५.
शाळेचे मुख्याध्यापक / प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
६. सदर समितीची दरमहा बैठक होईल.
७. सदर समिती दर 2 वर्षांनी पुनर्गठीत करण्यात येईल.
शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये
१. शाळेच्या कामकाजाचे सनियंत्रण करणे.
२. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान ३ महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करून त्याची शिफारस करणे.
३. त्या शाळेस शासनाकडून / स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे.
४. बालकांचे हक्क सर्वाना समजावून सांगणे व यासंदर्भातील पालक, शाळा, स्थानिक स्थानिक प्राधिकरण राज्य शासन यांच्या
जबाबदाऱ्यांबाबत माहिती देणे.
५. शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
६. बालकांची १०० टक्के उपस्थिती सातत्याने राहील यासाठी दक्षता घेणे.
७. शाळेतील विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नयेत या करिता संबंधित पालकांशी चर्चा करून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता प्रयत्न करणे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना पुन्हा नियमित शाळेत येण्याकरिता प्रयत्न करणे.
८. दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे,
९. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे. त्यांच्या अध्ययन सुविधांचे सनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता
वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
१०. शाळेतील प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे सनियंत्रण करणे.
११. शाळेचे वार्षिक उत्पन्न व खर्चलेखे तयार करणे.
१२. शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे.
१३. मुख्याध्यापकाच्या दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे.
१४. निरुपयोगी साहित्य रु.५०००/- (रु.पाच हजार मात्र) किंमती पर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे.
१५. शाळा इमारत इतर शालेय बांधकाम तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यांवर देखरेख करणे.
१६. शिक्षकांची अनियमितता, गैरवर्तन, वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करून किंवा लेखी स्वरुपात
शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रियेचे तीन टप्पे
अ) शाळा व्यवस्थापन समिती पुर्नगठन प्रक्रियेची पूर्व तयारी
ब) प्रत्यक्ष पुनर्गठन प्रक्रिया
क) शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन नंतरची कार्यवाही
अ) शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रियेची पूर्व तयारी
शाळेच्या मुख्याध्यापकांची पूर्व तयारी जेवढी नियोजनबद्ध असेल तेवढी प्रक्रिया सोपी व सर्वांच्या सहभागाची करता येते. सध्याच्या शाळा व्यवस्थापन समितीची मुदत संपल्यानंतर आठ दिवसात नवीन समिती स्थापन करणे अपेक्षित आहे. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठनाची तारीख, वेळ निश्चित करून सर्व पालकांना मुलांच्या माध्यमातून, प्रत्यक्ष भेटीतून, पुनर्गठन प्रक्रिया तारीख व वेळ याबाबत लेखी सूचनेद्वारे कळवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रीयेमध्ये अधिकाधिक पालकांचा, त्यातही महिलांचा सहभाग होण्यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करावे. उदा. किमान आठ दिवस अगोदर सर्व पालकांना आणि ग्रामपंचायतीला सूचना देणे, पुनर्गठन प्रक्रीयेपुर्वी सर्व पालकांच्या वैयक्तिक भेटी घेणे, मुलांच्या माध्यमातून पालकांना निरोप देणे व सर्व पालक शाळेत येतील हे निश्चित करणे, महिलांसाठी विशेष सभा व कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि यासाठी ग्रामपंचायतची मदत घेणे यासाठी मुख्याध्यापकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जावी, यासाठी एकूण समिती सदस्यांची वर्गनिहाय, विविध घटकनिहाय विवरण करून प्रत्यक्ष पुनर्गठन प्रक्रियेपूर्वी शाळेच्या फलकावर सदस्यत्वाची माहिती खुली करणे खूप महत्वाचे आहे, ज्यामुळे सर्व पालकांच्या मनातील संभ्रम दूर होईल.
याच बरोबर इतर घटकांना प्रतिनिधित्व देतानाही असाच नियम लावला पाहिजे की, ज्या वर्गात एखाद्या घटकातील मुलांची संख्या जास्त आहे तेथे त्या घटकांना प्रतिनिधित्व देणे. तसेच ज्या वर्गात मुलींची संख्या तुलनेने जास्त आहे तेथे महिला सदस्य घेणे अपेक्षित आहे.
शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया राबविण्याच्या दिवशी किंवा आठ दिवस अगोदर शाळेच्या दर्शनी भागावर किंवा फलकावर वर्ग निहाय, जात निहाय आरक्षण यादी लावली जावी, जेणे करून सर्व पालकांना याबाबत पूर्व कल्पना असेल. शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याअगोदर मुख्याध्यापकांनी ग्रामपंचायतीला पत्र देऊन ग्रामपंचायतकडून शाळा व्यवस्थापन समितीमध्ये स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायतच्या एका सदस्याची मागणी करून घ्यावी.
शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करताना प्रत्येक पालक वर्गनिहाय वर्गात बसतील व वर्गनिहाय सदस्य निवडले जातील यासाठी इतर शिक्षकांसोबत मुख्याध्यापकांचे नियोजन असावे जेणे करून मोठ्या शाळेत अधिक पटसंख्या असलेल्या शाळेत गोंधळ किंवा वाद निर्माण होणार नाहीत व सर्व प्रक्रियेत पारदर्शकता येईल याचे नियोजन करावे.
ब) प्रत्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया
शाळा व्यवस्थापन समिती गठीत करताना एकूण पालक संख्येच्या ७०% पालक उपस्थूत असतील याची खात्री मुख्याध्यापकांनी करावी आणि मगच पुनर्गठन प्रक्रियेला सुरुवात करावी. मुख्याध्यापकांनी प्रथमतः सर्व उपस्थित पालकांना एकत्र करून प्रथम एकत्र येण्याचा उद्देश व समितीमध्ये वर्गनिहाय, जातनिहाय, दुर्बल घटक व महिला प्रतिनिधी हे कोणत्या वर्गातून किती सदस्य घेणे आहेत याबाबत माहिती द्यावी जेणे करून ज्या पालकांनी निमंत्रण पत्र वाचले नसेल त्यांना माहिती होईल. त्यानंतर प्रत्येक पालकांना त्यांचा पाल्य ज्या वर्गात आहे त्या वर्गात जावून बसण्यासाठी सांगणे. उदा. एक मुल २ री ला असेल व एक ५ वी ला असेल व सदर पुनर्गठन प्रक्रियेसाठी आई वडील आले असतील तर एका एका वर्गात पाठविता येते. तसेच फक्त वडील आले असतील तर २ रीच्या वर्गातून त्यांची निवड नाही झाली तर ५ वीच्या वर्गासाठी निवड प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. त्यानुसार प्रत्येक वर्गातील सदस्यांची निवड करण्यात यावी.
प्रत्यक्ष निवड करताना खालील क्रमानुसार निवड प्रक्रिया होईल हे पहावे –
1) प्रथमतः वर्ग शिक्षकांनी प्रत्येक वर्गातून किती सदस्यांची निवड करायची आहे, यामध्ये महिला प्रतिनिधी, जातनिहाय प्रतिनिधी, दुर्बल घटक प्रतिनिधी याची माहिती जमलेल्या सर्व पालकांना द्यावी.
2) उपस्थित सर्व पालक, ग्रामस्थांना शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण हक्क कायद्यानुसार गठीत करावयाच्या समितीचे महत्व स्पष्ट करावे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीची शाळा विकासात जबाबदारी स्पष्ट करावी. ज्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या मासिक बैठकीस उपस्थित राहून शाळेच्या कामकाजात मदत करणे.
3) शिक्षण हक्क कायद्यानुसार दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या आणि शाळेसाठी वेळ देऊ शकणाऱ्या पालकांनी सहभाग घ्यावा यासाठी सर्व जबाबदारीचे वाचन करून दाखविणे, जेणेकरून कामासाठी पुढाकार घेणारा योग्य व्यक्तीच समितीमध्ये येईल व राजकीय महत्वकांक्षा असणारे व्यक्ती देखील स्वतःची जबाबदारी समजून घेऊनच सहभाग घेतील.
4) ज्या पालकांना शाळा व्यवस्थापन समितीचा भाग व्हायचा आहे अशा पालकांनी इच्छुक सदस्य म्हणून त्यांनी आपली नावे वर्ग शिक्षकांना द्यावी. जेणे करून वर्ग शिक्षक इच्छुक सदस्यांची नावे फलकावर क्रमानुसार लिहतील.
5) निवड प्रक्रिया करताना कोणाची हरकत नसेल तर प्रत्येक सदस्यांचे नाव घेऊन इतर पालकांना खुले मतदान करण्यासाठी सांगावे पण एक व्यक्ती दोन वेळेस मतदान करणार नाही याची काळजी घ्यावी.
6) वर्ग निहाय सदस्य निवडताना गोंधळ होणार असेल तर प्रत्येक वर्गात पालकांना बसविणे व एक चिठ्ठी देऊन त्यावर शाळेचा शिक्का मारणे व प्रत्येक सदस्यांच्या नावाचा किंवा अनुक्रमांकाचा चिठ्ठीवर उल्लेख करून तो वर्ग शिक्षकांकडे जमा करावा किंवा मतदान पेटीत टाकावा.
7) सर्व पालकांचे मतदान झाले हे निश्चित करून वर्ग शिक्षकांनी सर्व चिठ्ठया किंवा मतपेटीतील चिठ्ठया एकत्र करून प्रत्येक चिठ्ठीवरील अनुक्रमांक किंवा नाव मोठ्याने वाचून दाखविणे व त्याचा एकत्रित संघ करणे, ज्या सदस्यांच्या क्रमांकाच्या किंवा नावाच्या चिठ्या अधिक आहेत त्यांना त्या वर्गाचा सदस्य घोषित करणे.
8) प्रत्येक वर्गातून मुलांच्या प्रमाणात पालकांची शाळा व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून निवड झाल्यास शिक्षण प्रेमी किंवा शिक्षण तज्ञ म्हणून एका उच्च शिक्षित तरुण, निवृत्त शिक्षक किंवा ज्यांना शिक्षणात आवड आहे याची एकमताने निवड करण्यात यावी,
9) सर्व शिक्षकांनी ही आपल्यातून एका शिक्षकाची शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड करून द्यावी.
10) या प्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालक सदस्य, शिक्षण प्रेमी, ग्रामपंचायत सदस्य व शिक्षक प्रतिनिधी यांची निवड झाल्याचे निश्चित केल्यानंतरच अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करावी.
लक्षात घ्या की, अध्यक्ष निवड ही शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनीच करायची आहे, अध्यक्ष थेट साधारण पालक सभेतून निवडायचा नाही. त्यामुळे आधी समिती गठीत करून घ्यावी व नंतर त्या समितीने अध्यक्ष निवड करावी यामुळे अध्यक्षांची निवड करताना एक किंवा दोन दिवसाचा अवधी घेतल्यास शाळा व्यवस्थापन समिती निवडताना राजकीय रूप येत नाही. किंवा ग्रामस्थांमध्ये शाळेबाबत नाराजीची भावना निर्माण होणार नाही.
क) शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन नंतरची कार्यवाही
1) वर्ग निहाय निवडलेल्या सदस्यांची नावे सर्वाना सांगणे व इतिवृत्तावर सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेणे.
2) प्रत्येक महिन्याच्या शाळा व्यवस्थापन समिती बैठकीची एक तारीख निश्चित करणे, जेणेकरून प्रत्येक महिन्याच्या बैठकीसाठी
सदस्यांना पूर्व कल्पना येईल.
3) शाळा व्यवस्थापन समितीला शाळेच्या गुणवत्ता बाबत वर्ग निहाय माहिती देणे.
4) शाळेच्या गुणवत्ता व भौतिक सुविधाच्या आराखड्याबाबत कल्पना देणे व आवश्यक त्या ठिकाणी सहभाग निश्चित करावा. ज्यामुळे नियमित वेळेत हे आपल्या कामाचा भागच आहे असे सर्व सदस्य निश्चित करतील.
5) शाळा व्यवस्थापन समिती बैठका नियमित होण्यासाठी, शाळेत पालकांचा नियमित सहभाग होण्यासाठी काही नियमावली बनविणे. उदा. एखादा सदस्य सलग तीन महिन्याच्या बैठकीस उपस्थित नसल्यास त्यांचे सभासदत्व रद्द करणे, किमान तीन महिन्यातून एकदा पालक सभा घेण्यासाठी सर्व सदस्यांची जबाबदारी निश्चित करणे, अध्यक्ष हे सर्वांच्या अनुमतीने आर्थिक व्यवहार करतात परंतु निर्णय हे सर्व समिती सदस्यांना बैठकीतच घ्यावयाचा असतो.
6) मुलांच्या शिकण्यात पालकांचा सहभाग वाढीसाठी वर्ग निहाय नवनिर्वाचित सदस्यांच्या जबाबदारीचे वाटप करणे.
7) शिक्षण हक्क कायद्यानुसार समिती सदस्यांना त्यांच्या जबाबदारीची व अधिकारांची माहिती देणे.









