आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांना समुपदेशाद्वारे पदस्थापना देणे बाबत inter district transfer teacher samupdeshan
संदर्भ:-
01. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर यांच्या कार्यालयाचे कार्यमुक्ती आदेश क्र.पाजिप/शिक्षण/प्राथ/कार्यमुआदेश/आस्था/वशी/913/2025 दि.25.08.2025
02. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांची मंजुर टिपणी दि.26.09.2025
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने विकसित केलेली TTMS संगणीकृत प्रणालीतून, शासन निर्णय दि.07.04.2021 नुसार मधील तरतूदीनुसार तसेच तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रानुसार व विनंती अर्जानुसार तुमची ऑनलाईन आंतरजिल्हा बदली विशेष संवर्ग भाग-01, विशेष संवर्ग भाग-02, व सर्वसाधारण या संवर्गातून पालघर जिल्हा परिषदेमधुन नाशिक जिल्हा परिषदेत करण्यात आलेली आहे. त्यानुसार तुम्ही नाशिक जिल्हा परिषदेत दि.26.08.2025 रोजी हजर झाले आहात,
तुम्हास नाशिक जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेत पदस्थापना देणेकमी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली दि.29.09.2025 (सोमवार) रोजी दुपारी 04:00 वाजता जिल्हा परिषद नाशिक मधील के. रावसाहेब थोरात (जुने) सभागृहात समुपदेशन प्रक्रिया ठेवण्यात आलेली आहे.
सदर प्रक्रियेसाठी दि. 29.09.2025 रोजी दुपारी टिक 02:00 वाजता सभागृहात उपस्थित राहावे.
सदर समुपदेशन प्रक्रियेसाठी आपली ज्या संवर्गातून आंतरजिल्हा बदली झाली आहे. त्याबाबतचे तसेच आवश्यक असलेल्या सर्व मुळ कागदपत्रासह विहीत वेळेपूर्वी न चुकता उपस्थित राहावे.
सदर समूपदेशन प्रक्रियेसाठी अनुपस्थित राहिल्यास प्रशासकीय स्वरुपात पदस्थापना देण्यात येईल. याची जाणीव करुन देण्यात येत आहे.











