शालेय पोषण आहार / प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्वंयपाक गृहात शिजवण्यात येणाऱ्या आहारात किंवा धान्यादी मालामध्ये पाल किंवा अन्य कोणतेही किटक आढळून येणार नाहीत याची दक्षता घेणेबाबत mid day meal shaley poshan aahar

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय पोषण आहार / प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्वंयपाक गृहात शिजवण्यात येणाऱ्या आहारात किंवा धान्यादी मालामध्ये पाल किंवा अन्य कोणतेही किटक आढळून येणार नाहीत याची दक्षता घेणेबाबत mid day meal shaley poshan aahar

उपरोक्त विषयास अनुसरुन, विद्यामंदिर वझरे, तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथील प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शिजवण्यात येणाऱ्या स्वंयपाक गृहात शिजविलेल्या आहारात पाल आढळून आलेने सदरची चौकशी व सुनावणी घेण्यात आलेली आहे.

सद्यस्थितीत, कोल्हापूर जिल्हयातील 3015 पात्र शाळांतील इयत्ता । ली ते ऽवी व 6 वी ते 8वी तील एकूण 3.36.101 विदयार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेच्या आहाराचा लाभ देण्यात येतो. सदर आहार, संबंधीत शाळेच्या व्यवस्थापन समितीमार्फत विहीत कार्यपध्दतीनुसार नियुक्त केलेल्या स्वंयपाकी तथा मदतनीस यांचेमार्फत शाळेच्या आवारातील स्वंयपांकगृहात शिजविणेत येते. त्यानंतर शिजवलेल्या आहाराची स्वयंपाकी तथा मदतनीस, शिक्षक, पालक यांनी 30 मिनीटे अगोदर चव घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांना आहार देण्याची कार्यवाही करणे क्रमप्राप्त व बंधनकारक आहे.

वरीलप्रमाणे आहारात किवा धान्यादी मालामध्ये पाल किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे किटक, उंदीर, घुशी इत्यादी पडू नये अथवा आढळून येवू नये यासाठी स्वयंपाकगृहात नियमीतपणे स्वच्छता व साफसफाई करणेत यावी व पुरेशी दक्षता घेणेत यावी.

विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेच्या आहारातून कोणत्याही प्रकारची विषबाधा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, यामध्ये व वरील बाबीकडे दुर्लक्ष झालेचे आढळून आलेस, संबंधित मुख्याध्यापक यांना जबाबदार धरण्यात येवून त्यांचेवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावीत करण्यात यावी.

वरील सुचना सर्व संबंधितांना आपले स्तरावरुन निर्गमीत करण्यात याव्यात.

Related posts:

Leave a Comment