नवीन सेवानिवृत्तीवेतन योजना (NPS) लागू असलेल्या महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी Unified Pension Scheme (UPS) करिता विकल्प सादर करण्याबाबत
शासन परिपत्रक – केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने NPS (National Pension Scheme) लागू
असणाऱ्या केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना UPS (Unified Pension Scheme) चा विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासदर्भात दि.२४.०१.२०२५ ची अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्यानुसार UPS योजना दि.०१.०४.२०२५ पासून अंमलात आली असून पेंशन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार दि.३०.०९.२०२५ पर्यंत UPS निवडण्याबाबतचे विकल्प सादर करावयाचे होते. याकरिता महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील (IAS/ IPS/ IFOS) ज्या अधिकाऱ्यांना NPS लागू आहे त्यांना Unified Pension Scheme (UPS) विकल्प निवडण्याबाबत आवश्यक सूचना या विभागाच्या दि.२५.०८.२०२५ च्या परपित्रकान्वये देण्यात आल्या आहेत.
२. आता, केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने दिनांक ३०.०९.२०२५ रोजी पेंशन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) यांना पाठविलेल्या पत्रान्वये, कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या वैवाहिक जोडीदारांनी UPS विकल्प सादर करण्याची मुदत दि.३०.११.२०२५ पर्यंत वाढविलेली आहे.
३. महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी Unified Pension Scheme (UPS) विकल्प online पद्धतीने सादर करण्याबाबत अद्याप सुविधा उपलब्ध झालेली नसल्यामुळे अखिल भारतीय सेवेतील ज्या अधिकाऱ्यांनी त्यांचे UPS चे विकल्प अद्याप सादर केलेले नाहीत,
त्यांना सदर विकल्प सादर करावयाचे असल्यास, ते दि.२७.११.२०२५ पर्यंत offline पद्धतीने या विभागाच्या दि.२५.०८.२०२५ च्या परिपत्रकातील सूचनांनुसार संबंधित प्राधिकाऱ्यांकडे सादर करावेत व संबंधित प्राधिकाऱ्यांनी सदरचे विकल्प प्रमाणित करुन दि.२८.११.२०२५ पर्यंत सहायक संचालक (लेखा), भाप्रसे-४, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे सादर करावेत.
४. सदर परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२५१०१४१२०८०७७००७ असा आहे. सदर परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.











