जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती jnvst exam all information navodaya exam

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती jnvst exam all information navodaya exam

1. चाचणीचे स्वरूप

(एकच संयुक्त प्रश्नपत्रिका 100 गुण) (वेळ: 2 तास)

सूचना: निवड परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असतो आणि या परीक्षेची तीन भागांत विभागणी केलेली असते. यांत 100 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रकारचे एकूण 80 प्रश्न असतात.

विभाग एक मानसिक क्षमता चाचणी (40 प्रश्न 50 गुण)

नवोदय प्रवेशपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत ‘मानसिक क्षमता चाचणी’ या विषयात एकूण दहा भाग असतात. या दहा भागांत प्रत्येकी चार-चार प्रश्न असून एकूण 40 प्रश्न असतात. हे सर्व प्रश्न केवळ आकृत्यांचे असतात. प्रत्येक भागाकरिता वेगवेगळ्या सूचना असतात. उमेदवारांच्या सुप्त क्षमतांचे मापन करणे हा या चाचणीचा उद्देश असतो.

विभाग दोन अंकगणित (20 प्रश्न 25 गुण)

या प्रश्नपत्रिकेतील ‘अंकगणित’ या विषयावरील प्रश्नांचा उद्देश उमेदवारांच्या अंकगणितातील मूलभूत क्षमता तपासणे, हा आहे.

अंकगणित विषयाच्या चाचणीत मुख्यतः आकलन आणि उपयोजन यांच्या संबोधांवर आणि कौशल्यांवर भर देण्यात येतो. उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी या नवनीतमध्ये अनेक नमुना उदाहरणे दिली आहेत.

विभाग तीन भाषा (20 प्रश्न 25 गुण)

या प्रश्नपत्रिकेतील ‘भाषा’ या विषयावरील प्रश्नांचा उद्देश उमेदवारांच्या वाचन-आकलनाचे मापन करणे हा

आहे. चाचणीमध्ये चार परिच्छेद असतील. प्रत्येक परिच्छेदाखाली पाच-पाच प्रश्न दिलेले असतील, उमेदवारांनी प्रत्येक परिच्छेद काळजीपूर्वक वाचून, त्याच्याखालील प्रश्नांची उत्तरे दयायची आहेत.

2. सूचना आणि उदाहरणांसंबंधी

– (1) उमेदवारांनी प्रश्न सोडवण्यास सुरुवात करण्यापूर्वी, चाचणी पुस्तिकेच्या प्रथम पृष्ठावर दिलेल्या सूचना, तसेच प्रत्येक चाचणीच्या विभागाच्या सुरुवातीला दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.

(2) उमेदवारांनी सर्वप्रथम चाचणी पुस्तिका त्यांनी परीक्षेसाठी निवडलेल्या माध्यमाची आहेना, हे तपासून पाहावे. नसल्यास, परीक्षा सुरू होण्यापूर्वी उमेदवारांनी चाचणी पुस्तिका बदलून घ्यावी.

(3) प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी साधारणपणे दीड मिनिट लागेल, असे गृहीत धरलेले असते. तेव्हा उमेदवारांनी एकाच प्रश्नासाठी फार वेळ देऊ नये. जर एखादा प्रश्न कठीण वाटत असेल, तर तो सोडवण्यासाठी वेळ वाया न घालवता, त्यापुढचे प्रश्न सोडवावेत. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर न सुटलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे वेळ वाचेल.

(4) एकूण प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी सलग दोन तास इतका वेळ दिला जाईल. दिव्यांग विद्यार्थ्यांना अतिरिक्त 40 मिनिटे दिली जातील.

(5) प्रवेशपात्र ठरण्यासाठी तिन्ही चाचण्यांमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने, एकाच चाचणीवर फार वेळ खर्च न करता, एकंदर वेळेची विभागणी स्वतःच्या मर्जीनुसार करण्याची मुभा उमेदवाराला आहे.

(6) दर 30 मिनिटांनी बेल वाजवून वेळेची सूचना देण्यात येईल.

सूचना :

(1) योग्य प्रवेशपत्र दाखवल्याशिवाय उमेदवाराला परीक्षागृहात प्रवेश मिळणार नाही.

(2) चाचणी परीक्षा सुरू होऊन तीस मिनिटे झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश मिळणार नाही.

(3) चाचणी परीक्षा सुरू होऊन तीस मिनिटे होईपर्यंत कोणत्याही उमेदवाराला परीक्षागृह सोडता येणार नाही.

3. उत्तरे रेकॉर्ड करण्याची पद्धत

(1) एक स्वतंत्र OMR (ऑप्टिकल मार्क रेकग्निशन) उत्तरपत्रिका प्रदान केली जाईल. उमेदवारांनी OMR उत्तरपत्रिकेवर योग्य ठिकाणी उत्तरे दर्शवणे आवश्यक आहे. (नमुना OMR उत्तरपत्रिकेची एक प्रत जवाहर नवोदय विदधालयाच्या वेबसाइटवर अपलोड केली जाईल.)

(2) OMR शीटवर लिहिण्यासाठी फक्त निळ्या किंवा काळ्या बॉलपॉईंट पेनचा वापर करावा. उमेदवाराने स्वतःचे बॉलपॉईंट पेन आणावे. पेन्सिल वापरण्यास सक्त मनाई आहे.

(3) प्रत्येक प्रश्नासाठी चार संभाव्य उत्तरे आहेत; त्यांपैकी फक्त एकच बरोबर आहे. उमेदवाराने योग्य उत्तर निवडणे आणि निवडलेल्या उत्तराच्या वर्णाक्षराचे वर्तुळ गडद करणे आवश्यक आहे. उदा., प्रश्न क्रमांक 37 चे तुमचे उत्तर असल्यास, पुढे दिल्याप्रमाणे C वर्णाक्षराचे वर्तुळ गडद करा.

(4) गडद बर्तुळात कोणताही बदल करण्याची परवानगी नाही. उत्तर रद्द करणे, पांढरी शाई लावणे आणि OMR उत्तरपत्रिकेवरील नोंदवलेले उत्तर खोडणे यासदेखील अनुमती नाही. अशा उत्तरांचे मूल्यमापन केले जाणार नाही.

( 5) प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1.25 गुण दिला जाईल.

(6) चुकीच्या उत्तरांसाठी गुण कमी (निगेटिव्ह मार्किंग) केले जाणार नाहीत.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षेसंबंधी माहिती

1. निवडीच्या आणि प्रवेशाच्या अटी

(1) ही स्पर्धात्मक परीक्षा असल्यामुळे उमेदवाराने केवळ तिन्ही चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होऊन भागणार नाही; तर अधिकाधिक गुण मिळवून गुणवत्ता यादीमध्ये त्याने वरचा क्रमांक पटकावणे आवश्यक आहे.

(2) चाचणीमध्ये अधिक गुण मिळवले म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळाला असे मानू नये. प्रत्यक्ष प्रवेश घेतेवेळी समितीने ठरवून दिलेली योग्य ती प्रमाणपत्रे सादर केल्यानंतरच प्रवेश मिळू शकेल.

(3) प्रत्यक्ष प्रवेश देताना सर्व प्रमाणपत्रे तपासून खात्री करेपर्यंत, जवाहर नवोदय विद्यालयात केलेली निवड हो तात्पुरती आहे, असे समजण्यात येईल. उमेदवारांनी कागदपत्रांची पडताळणी आणि संबंधित जवाहर नवोदय विद्यालयाद्वारे प्रवेशाची पुष्टी केल्यानंतरच पालकांनी शाळेकडून हस्तांतरण प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा.

(4) कोणत्याही तक्रारीच्या बाबतीत जवाहर नवोदय विद्यालय समितीचा निर्णय अखेरचा आणि बंधनकारक राहील, (5) उमेदवारांचे (निवड झालेल्या व न झालेल्या) चाचणीतील गुण कळवण्यात येणार नाहीत.

(6) उत्तरपत्रिकेची फेरतपासणी करण्याची तरतूद नाही. निकाल संगणकावर तयार होत असल्याने पुन्हा गुणांची ( बेरीज तपासण्याची आवश्यकता नसते; कारण निकाल तयार करताना त्याची प्रत्येक पायरीवर काळजीपूर्वक, काटेकोरपणे तपासणी करण्यात येते.

(7) कोणतीही चौकशी करताना उमेदवाराचे नाव, क्रमांक यांबरोबरच केंद्र क्रमांक, गट, जिल्हा आणि राज्य ही माहिती दिल्याशिवाय तिची दखल घेतली जाणार नाही.

(8) उमेदवार आणि पालक यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की, जवाहर नवोदय विद्यालयाच्या नियमांनुसार आणि राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या दृष्टीने एका हिंदी भाषिक विद्यालयातील विद्यार्थी नववीत्त (IX) गेले की, ( त्यांना दुसऱ्या अहिंदी भाषिक नवोदय विद्यालयात, तसेच उलटपक्षी, एका शैक्षणिक वर्षाकरिता पाठवले जाऊ शकते. जर विदधार्थ्यांनी स्थलांतरास नकार दिला, तर त्यांना नवोदय विदद्यालयात पुढे शिकण्याची परवानगी (-दिली जाणार नाही.

(9) उमेदवार आणि पालक यांनी लक्षात घ्यावे की, निवड झालेल्या उमेदवारांनी ज्या जवाहर नवोदय विद्यालयातून चाचणी दिली असेल, त्याच जिल्हयातील विदद्यालयामध्ये त्यांना प्रवेश दिला जाईल, कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराला इतर नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, तसेच विद्यार्थ्यांच्या स्थलांतराची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.

(10) अनुसूचित जाती, जमातींच्या आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांची निवड झाल्यास त्यांनी त्यांच्या जातीची प्रमाणपत्रे, प्रवेश घेण्याच्या वेळी सादर केली पाहिजेत. इतर मागासवर्गीय कोट्यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय यादीच्या विहित नमुन्यानुसार प्रमाणपत्र सादर करावे लागेल. असे प्रमाणपत्र प्रवेश वर्षांच्या 30 मार्च या तारखेपूर्वी सक्षम अधिकाऱ्याकडून प्राप्त करावे, जेणेकरून ते दस्ताऐवज पडताळणीच्या वेळी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांना सादर करता येईल.

(11) ग्रामीण प्रवर्गातील प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना, ज्या शाळेत त्यांनी इयत्ता तिसरी, चौथी आणि

पाचवीचे शिक्षण घेतले ती शाळा ग्रामीण भागात आहे, असे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. (12) दिव्यांग प्रवर्गातील (ऑर्थोपेडिकदृष्ट्या अपंग, श्रवणदोष, दृष्टिहीन) उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संबंधित जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे योग्य स्वरूपातील वैदयकीय प्रमाणपत्र सादर

करावे लागेल.

(13) ट्रान्सजेंडर श्रेणीतील उमेदवारांना संबंधित राज्य सरकारने अंकित केलेल्या सक्षम अधिकारी विभागाकडून त्यांच्या लिंगाविषयी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. या प्रवर्गासाठी कोणतेही आरक्षण नाही.

2. पात्रता

जवाहर नवोदय विद्यालयांसाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत :

सर्व उमेदवारांसाठी :

(1) इयत्ता पाचवी उत्तीर्ण झाल्यावर जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सहावीच्या वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला एक चाचणी परीक्षा (जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा) दयावी लागेल. या चाचणी परीक्षेत यशस्वी झाल्यावर गुणांच्या आधारे नवोदय विद्यालयात प्रवेश देण्यात येईल.

(2) ज्या जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय अस्तित्वात असेल, त्याच जिल्ह्यातील उमेदवार या वि‌द्यालयात प्रवेशास पात्र असतील, मात्र, जवाहर नवोदय विद्यालय सुरू झाल्यानंतर जिल्ह्याचे विभाजन झाले असल्यास आणि नव्याने निर्माण झालेल्या जिल्ह्यात नवीन विद्यालय अद्याप सुरू झाले नसल्यास, प्रवेशाच्या पात्रतेसाठी जिल्ह्याच्या जुन्या सीमा गृहीत धरल्या जातील.

(3) ज्या जिल्ह्यामध्ये उमेदवार मान्यताप्राप्त शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत असेल, त्याच जिल्ह्यात त्याला निवड चाचणी परीक्षेस बसता येईल. शासनाने किंवा सक्षम अधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाच या प्रवेशपरीक्षेस बसण्याचा अधिकार राहील. उमेदवाराचा सहावीतील प्रत्यक्ष प्रवेश हा अर्थातच पाचवी उत्तीर्ण होण्याच्या अटीवरच दिला जाईल.

(4) प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराचे वय, त्या वर्षाच्या मे महिन्यात नऊ वर्षांपेक्षा कमी अथवा तेरा वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये. ही अट अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसह सर्व उमेदवारांना लागू आहे.

(5) प्रवेश घेणारा उमेदवार प्रवेश घेण्यापूर्वीच्या तीन वर्षांत अनुक्रमे तिसरी, चौथी आणि पाचवी इयत्ता शासनमान्य

शाळेमध्ये प्रत्येकी पूर्ण वर्ष पुरे करून उत्तीर्ण झालेला असावा.

(6) उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांदा प्रवेश चाचणीस बसता येणार नाही.

7) निवड चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या पालकांना प्रवेशाच्या वेळी पुढील गोष्टी सादर कराव्या लागतील.: 1. विहित प्रोफॉर्मामध्ये प्रतिज्ञापत्र / रहिवासी प्रमाणपत्र, तसेच संबंधित विद्यालयाने मागणी केलेली

इतर कागदपत्रे. 2. ग्रामीण कोठधातून प्रवेश घेऊ इच्छिणान्या उमेदवारांसाठी, ‘मूल अधिसूचित ग्रामीण भागात असलेल्या संस्थेत शिकत आहे आणि ते अधिसूचित ग्रामीण भागात राहत आहेत’, असे प्रतिज्ञापत्र पालकांना सादर करावे लागेल.

ग्रामीण उमेदवारांसाठी :

(1) प्रत्येक जिल्ह्यातील किमान 75% जागा ग्रामीण भागांतील उमेदवारांना देण्यात येतील आणि उरलेल्या जागा त्या त्या जिल्ह्यातील शहरी विभागांतून भरण्यात येतील.

(2) ग्रामीण कोट्यातून प्रवेश घेणारा उमेदवार प्रवेश घेण्यापूर्वीच्या तीन वर्षांत अनुक्रमे तिसरी, चौथी आणि पाचवी इयत्ता ग्रामीण भागातील शासनमान्य शाळेमध्ये प्रत्येकी पूर्ण वर्ष पुरे करून उत्तीर्ण झालेला असावा.

(3) राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थान (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग) अंतर्गत शिकणाऱ्या उमेदवारांनी जिल्हा दंडाधिकारी/तहसीलदार/गट विकास अधिकारी यांनी जारी केलेले ग्रामीण स्थितीचे प्रमाणपत्र सादर करावे.

शहरी उमेदवारांसाठी :

उमेदवाराने तिसरी, चौथी आणि पाचवी इयत्ता यांतील एखादे वर्ष अगर एक दिवस जरी शहरी विभागात अध्ययन

केले असेल, अगर शहरी विभागातून तो एखादी इयत्ता उत्तीर्ण झाला असेल, तर त्याला ‘शहरी’ विभागातील मानण्यात येईल. 2011 च्या जनगणनेनुसार किंवा शासकीय परिपत्रकानुसार ‘शहरी’ म्हणून जाहीर झालेल्या विभागांनाच ‘शहरी

मानले जाईल. इतर सर्व विभाग ग्रामीण समजले जातील.

राखीव जागा :

(1) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव जागांची तरतूद आहे.

2) मुलींसाठी एकूण जागांच्या एक तृतीयांश राखीव जागांची तरतूद आहे.

( ( 3) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी संबंधित जिल्ह्यात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात

आरक्षण आहे, परंतु कोणत्याही जिल्ह्यात असे आरक्षण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी नसेल (अनुसूचित जातींसाठी 15% आणि अनुसूचित जमातींसाठी 7.5%) परंतु दोन्ही श्रेणींचे एकत्रितपणे जास्तीत जास्त 50% असेल.

(4) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणाव्यतिरिक्त इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 27%

आरक्षणाची तरतूद आहे.

(5) दिव्यांग मुलांसाठीही राखीव जागांची तरतूद आहे.

3. अर्ज कसा करावा ?

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2023 साठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया :

(1) ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात

आली आहे. www.navodaya.gov.in द्वारे जोडलेल्या NVS च्या प्रवेश पोर्टलवरून विनामूल्य नोंदणी केली जाऊ शकते. निकाल जाहीर झाल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांच्या निवास, वय, पात्रता इत्यादी पुराव्यांची पडताळणी निश्चित केलेल्या प्रक्रिये‌द्वारे केली जाईल.

(2) पात्र उमेदवारांनी ऑनलाइन फॉर्म भरून उमेदवार आणि त्याचे/तिचे पालक या दोघांच्या स्वाक्षरी व फोटोसह प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. आवश्यक कागदपत्रे 10-100 केबीपर्यंत व जेपिजि फॉरमॅटमध्येच अपलोड करायची आहेत.

(3) NIOS मधील उमेदवारांनी ‘B’ प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे निवासस्थान जिथे प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्याच जिल्ह्यात असले पाहिजे.

(4) ऑनलाइन माध्यम सर्वांसाठी मुक्त आणि विनामूल्य आहे, डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाइल, टैबलेट इत्यादींसारख्या कोणत्याही माध्यमातून अर्ज करता येईल.

(5) सर्व JNV मध्ये, उमेदवार/पालकांना त्यांचे अर्ज विनामूल्य भरण्यासाठी मदतकक्ष (हेल्प डेस्क) उपलब्ध असतो. नोंदणी प्रक्रियेसाठी पालक उमेदवारासह, मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र, उमेदवार व पालक यांच्या स्वाक्षरीसह फोटो ही आवश्यक कागदपत्रे आणि एसएमएसद्वारे नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी वैध मोबाइल नंबर असलेल्या मोबाइल फोनसहित JNV मधील मदत कक्षावर संपर्क साधू शकतात.

प्रवेशपत्र जारी करणे :

NVS ने ठरवलेल्या तारखेनुसार प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जातील आणि ती प्रवेश पोर्टलवर प्रदर्शित केली जातील. JNVST आयोजित करण्यापूर्वी उमेदवार/पालकांना प्रवेशपत्रे विनामूल्य डाउनलोड करता येतील.

निवड चाचणीचा निकाल :

उमेदवारांना प्रवेश पोर्टलवरून नवोदय विद्यालय निवड चाचणीचा निकाल प्राप्त करता येईल. निकाल संबंधित

कार्यालयातही प्रदर्शित केला जाईल.

(1) जवाहर नवोदय विद्यालय

(2) जिल्हा शिक्षण अधिकारी

(3) जिल्हा दंडाधिकारी

(4) उपायुक्त, नवोदय विद्यालय विभागीय समिती

(5) नवोदय विद्यालय समितीचे संकेतस्थळ- www.navodaya.gov.in

संबंधित जवाहर नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापकही निवडलेल्या उमेदवारांना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर

एसएमएसद्वारे आणि त्यानंतर स्पीड पोस्टद्वारे सूचित करतील.

4. निवडीनंतर सादर करावयाची कागदपत्रे

प्रवेशासाठी तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांच्या पालकांना प्रवेशाच्या वेळी पुढील कागदपत्रे पडताळणीसाठी

सादर करावी लागतील :

(1) जन्मतारखेचा दाखला.

(2) नवोदय विद्यालयाच्या अटींनुसार पात्रतेचे पुरावे.

(3) ग्रामीण कोट्याअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी, पालकांनाही सक्षम अधिकारी विभागाकडून ग्रामीण

भागातील संस्थेत/शाळेत मुलाने शिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

(4) केवळ NIOS अभ्यासासाठी विहित प्रोफॉर्मामध्ये निवास प्रमाणपत्र.

(5) आवश्यकतेनुसार अन्य कागदपत्रे.

Related posts:

Leave a Comment