शालेय विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धनावर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करणेबाबत National Painting Competition on Energy Conservation
संदर्भ ऊर्जा दक्षता ब्यूरो, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांचे दि. २२ सप्टेंबर, २०२५ रोजीचे पत्र.
महोदय,
(ऊर्जा दक्षता ब्यूरो, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत दरवर्षी National Painting Competition on Energy Conservation या स्पर्धेचे आयोजन शालेय विद्यार्थ्यांसाठी करण्यात येते. ऊर्जेचा अधिक कार्यक्षमतेने वापर, ऊर्जा बचत व अपारंपरिक ऊर्जेद्वारे बीज निर्मिती केल्यास कार्बन उत्स॑जनास प्रतिबंध होऊन जागतिक तापमान वाढ कमी करणे शक्य आहे. या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने ऊर्जा दक्षता ब्यूरो, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी (गट-अ) व इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्याथ्यांसाठी (गट-ब) असे गट करुन चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या अनुषंगाने राज्यातून जास्तीत जास्त शाळांचा सहभाग होण्याच्या दृष्टीने विद्युत मंत्रालय यांचे शालेय स्तरीय चित्रकला स्पर्धा २०२५” साठीचे परिपत्रक सोबत जोडले आहे. सदर चित्रकला स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे विषय देण्यात आले आहेत –
31. Save Energy, Save Earth (ऊर्जा वाचवा, पृथ्वी वाचवा)
. Be a Star – Use BEE Star Appliances (स्टार मानांकन असणाऱ्या उपकरणांचा वापर करा)
सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शाळेला www.paintings.beeindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच गट-अ व गट-ब करीता शालेय स्तरावर दोन तासाची चित्रकला स्पर्धा आयोजित करुन प्रत्येक गटातील दोन उत्कृष्ट चित्र दि.३१ ऑक्टोबर, २०२५ पूर्वी राज्याच्या नोडल ऑफिसरला पाठविण्यात यावीत, त्याचप्रमाणे सर्व स्पर्धकांची यादी संकेतस्थळावर अपलोड करावयाची आहे. त्यानुसार नोडल ऑफिसरमार्फत दि.१४ ते २५ नोव्हेंबर, २०२५ दरम्यान मुंबई येथे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेमध्ये विजेत्यांना खालीलप्रमाणे पारितोषिक देण्यात येणार आहे.
तसेच राज्यस्तरीय विजेत्यांना दि.११ डिसेंबर, २०२५ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित “राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये” भाग घेण्याची संधी मिळणार आहे. सदर स्पर्धेतील विजेत्यांना दि.१४ डिसेंबर, २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात मा. राष्ट्रपती यांच्या शुभहस्ते पारितोषिक मिळणे नियोजित आहे. राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना खालीलप्रमाणे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे-
त्याचप्रमाणे राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना व त्यांचे पालकांना जानेवारी, २०२६ मध्ये गुजरात येथे पर्यटनास ऊर्जा दक्षता ब्यूरो, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत पाठविण्यास येणार आहे.
तरी या अनुषंगाने आपणास विनंती की, उपरोक्त चित्रकला स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त शाळांचा सहभाग होण्याच्या दृष्टीने शाळांना आपलेमार्फत सूचित करावे. सदर स्पर्धेबाबतची सर्व माहिती www.paintings.beeindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सदर स्पर्धेसाठीच्या नोडल ऑफिसरचा पत्ता खालीलप्रमाणे आहे –









