केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा योजनेचा निधी वितरित करण्यासाठी SNA SPARSH कार्यपध्दतीबाबत ऑनलाईन बैठकीस उपस्थित राहणेसंदर्भात sna sparsh karyapaddhtti paripatrak
संदर्भ:- १० शासन निर्णय क्रमांक:- संकीर्ण२०२५/प्र.क्र.१३३/एसडी-१ दि.३१/०७/२०२५.
Pdf download
२) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/लेखा/समप्रशिक्षा/२०२५-२६/२९७३ दि.०३.१०.२०२५
उपरोक्त विषयी आपणांस कळविण्यात येते की, समग्र शिक्षा योजनेअंतर्गत SNA SPARSH प्रणालीमध्ये निधी वितरण व खर्च करण्याबाबत वरील संदर्षिय शासन निर्णयानुसार निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने SMA SPARSH अंतर्गत SNA PORTAL वर करावयाच्या कार्यपध्दतीबाबत सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, वरिष्ठ लेखा लिपिक, गट साधन केंद्रामधील लेखाविषयक काम पाहणारे कर्मचारी यांना सदर प्रणालीबाबत माहिती अवगत व्हावी याकरिता दि.०७/१०/२०२५ ते दि.०७/११/२०२५ या कलावधीत प्रति दिन चार सत्रांमध्ये ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले असून दिनांक ००७/१०/२०२५ ते दि.१०/१०/२०२५ या कालावधीतील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
तथापि, दि. २०.१०.२०२५ ते ०२.११.२०२५ या कलावधीत शाळांना दिवाळीची सुट्टी असल्या कारणाने सदर कालावधीतील संबंधित प्रशिक्षण सत्रांचे वेळापत्रक पुन्हा नियोजित (Reschedule) करण्यात आले आहे त्याअनुषंगाने. नव्याने तयार करण्यात आलेले जिल्हानिहाय प्रशिक्षण सत्रांचे सुधारित वेळापत्रक (दिनांक ०३/११/२०२५ ते १७/११/२०२५७० सोबत जोडण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिल्हा / मनपा स्तरावरील शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, वरिष्ठ लेखा लिपिक, गट साधन केंद्रामधील लेखाविषयक काम पाहणारे कर्मचारी आणि समग्र शिक्षा अंतर्गत शाळांचे सर्व मुख्याध्यापक यांनी मत्रासोबत जोडलेल्या जिल्हानिहाय शाळांच्या यादीप्रमाणे या कार्यालयामर्फत करण्यात येणा-या ऑनलाइन प्रशिक्षणसाठी ऑनलाइन उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून निर्देश व्हावेत. तसेच याबाबत या कार्यालयास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करावे, ही विनंती.









