थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत सन २०२५-२६ thakit vetan bill online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत सन २०२५-२६ thakit vetan bill online

थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत.सन २०२५-२६

शासन निर्णय pdf download

संदर्भ- १) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २४१५/३४/१५)/ अर्थसंकल्प, दिनांक १५/७/२०१७.

२) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/थकीत वेतन/२०२१/३०७० दिनांक ४/८/२०२१

३) दिनांक ६/६/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.

४) दिनांक ३/९/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.

५) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालाचे/थकीत/ऑनलाईन/५०४७

दिनांक-११/९/२०२४.

६) संचालनालयाचे परिपत्रक क्र. प्राशिसं/अंदाज-२०३/थकोतशाओं/२०२४/६०९४

दिनांक-१२/९/२०२४.

सन २०२४-२५ पासून शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. यासंदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्र. ५ व ६ अन्वये देण्यात आलेल्या आहेत.

सन २०२५-२६ मध्ये शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्याअनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

शासनास सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीचे थकीत देयकाचा प्रस्ताव विवरणपत्र-३ मध्ये सादर करावे. प्रस्तावासोबत तपासणीसूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने प्रस्ताव २ प्रतीमध्ये सादर करावा.

डीडीओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरुन थकीत देयके (नियमित व न्यायालयीन प्रकरणे) (केवळ १ ते ६ वर्ष व ६ वर्षापेक्षा जास्त कालावधीचे) ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक ३१/१२/२०२५ पर्यंत सुविधा उपलब्ध राहील, त्यानंतर सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही.

डीडीओ-२ शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक/अधीक्षक, वेतन पथक प्राथमिक स्तरावरुन थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक ३१/०१/२०२५ पर्यंत सुविधा उपलब्ध राहील. डिडिओ २ यांनी अंतिम दिनांकापर्यंत वाट न पाहता शाळा/मुख्याध्यापक यांचेकडून जसे जसे ऑनलाईन थकीत देयके प्राप्त होतील तसे नियमानुसार पडताळणी करून चकीत देयके त्वरीत पुढे अग्रेषित करावी.

सन २०२४-२५ मध्ये डिडिओ-२ यांनी शाळा/मुख्याध्यापक यांचेकडून ऑनलाईन प्राप्त चकीत देयके नियमानुसार ऑनलाईन तपासणी न करता फॉरवर्ड केल्याचे मागील वर्षी निदर्शनास आले होते. त्यामुळे डिडिओ-२ यांनी शाळा/मुख्याध्यापक यांचेकडून ऑनलाईन प्राप्त बकीत देयके नियमानुसार ऑनलाईन तपासणी/पडताळणी करूनच पुढे फॉरवर्ड करावे,

डीडीओ-३ विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरुन थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक १०/०२/२०२५ पर्यंत सुविधा उपलब्ध राहीन, डिडिओ-३ यांनी अंतिम दिनांकापर्यंत वाट न पाहता शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक/अधीक्षक, वेतन पथक प्राथमिक/माध्यमिक यांचेकडून ऑनलाईन प्राप्त थकीत देयके नियमानुसार पडताळणी करून त्वरीत संचालनालयास फॉरवर्ड करावे.

उपरोक्त नमूद अंतिम दिनांकापर्यंत संबंधित डिडिओ यांनी वाट न पाहता त्यांचे स्तरावर ऑनलाईन प्राप्त थकीत देयके नियमानुसार पडताळणी करून त्वरील पुढील डिडिओकडे ऑनलाईन अग्रेषित करावीत. व यासोबतच सदरील देयकाची (हार्ड कापी) पडताळणीसह व स्पष्ट शिफारशीसह संचालनालयास सादर करावी.

सन २०२४-२५ मध्ये डिडिओ-३ यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक/अधीक्षक, वेतन पथक प्राथमिक/माध्यमिक यांचेकडून ऑनलाईन प्राप्त काही थकीत देयके नियमानुसार ऑनलाईन तपासणी न करता संचालनालयाकडे फॉरवर्ड केल्याचे मागील वर्षी निदर्शनास आले होते. त्यामुळे डिडिओ-३ यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक/अधीक्षक, वेतन पथक प्राथमिक/माध्यमिक यांचेकडून ऑनलाईन प्राप्त थकीत देयके नियमानुसार ऑनलाईन तपासणी/पडताळणी करूनच पुढे फॉरवर्ड करावे.

वरीलप्रमाणे दिलेल्या नियोजनानुसार थकीत देयकांसाठी निधी उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने आपल्यास्तरावरुन दिलेली कालमर्यादा पाळल्यास दिनांक १५/७/२०१७ च्या शासन निर्णयातील परिच्छेद २ मधील सूचनांनुसार कार्यवाही करणे मोईचे होईल व पर्यायाने चालू आर्थिक वर्षातील मंजूर असलेल्या तरतूदी मधून नियमित वेतनाचा खैर्च नियमितपणे भागविणे सुकूर होईल. तसेच थकीत वेतनासाठी तरतूद उपलब्ध करुन देणेबाबत कार्यवाही करता येईल. वर नमूद कालमर्यादा सर्वच स्तरावर तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी. सन २०२५-२६ मधील शालार्थ प्रणालीमधील थकीत देयकासंदर्भात केलेल्या सुधारित सुविधांच्या सविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये (User Manual) पहावे.

शासन निर्णय pdf download

Related posts:

Leave a Comment