सन २०२४-२५ संचमान्यतेनुसार शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे समायोजन करणेबाबत sanchmanyata samayojan

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२४-२५ संचमान्यतेनुसार शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे समायोजन करणेबाबत sanchmanyata samayojan

संदर्भः १. शासन निर्णय क्रमांक. संकीर्ण-२००/प्र.क्र.६७/टिएनटी-१ दि.०४.०४.२०२५.

२. मा.आयुक्त (शिक्षण) यांचेकडील दि.२७.०५.२०२५ रोजीची बैठकीतील निर्देश.

३. संचालनालयाचे पत्रक्र. शिसंमा/शिक्षकेत्तर पदभरती/कार्यासन टि-४/२५९२ दि.२८.०५.२०२५.

४. संचालनालयाचे पत्रक्र. शिसंमा/शिक्षकेत्तर समायोजन/कार्यासन टि-४/१४८१६१६ दि.०९.१०.२०२५

उपरोक्त संदर्भिय संचालनालयाचे संदर्भ क्र.४ च्या पत्रान्वये सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार मंजूर व रिक्त, अतिरिक्त बाबत पदांची माहिती संचमान्यता प्रणालीच्या वेबसाईटवरील उपलब्ध माहितीनुसार वर्ग-३ च्या शिक्षकेत्तर संवर्गातील १३०१ ( अधीक्षक या संवर्गातील ०४ पदे वगळून) अतिरिक्त शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे अन्यत्र रिक्त असणा-या शाळांमधील पदावर समायोजन करण्याची कार्यवाही करावी तसेच समायोजन करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय पदभरतीबाबत निर्णय घेत नसल्याने समायोजनाची कार्यवाही तात्काळ करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास तात्काळ सादर करणेबाबत कळविण्यात आले होते.

सबब सन २०२४-२५ संचमान्यतेनुसार शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे समायोजनाची माहिती सोबत जोडलेल्या प्र-पत्रात भरुन संचालनालयास दि.21.११.२०२५ पर्यंत तात्काळ सादर करावी.

शासन परिपत्रक pdf download

Related posts:

Leave a Comment