राज्यामध्ये जिल्हा, तालुका, केंद्रस्तरावर सकारात्मक शिस्त या विषयावर शिक्षण परिषदेमध्ये विशेष सत्रे आयोजित करणेबाबत shista vishesh satra paripatrak
संदर्भ :- मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव यांचे पत्र क्र. मंत्री / शालेय शिक्षण / जनरल / १११४१, दिनांक २६ नोव्हेंबर, २०२५
महोदय,
उपरोक्त विषयाच्या संदर्भाधीन पत्राची प्रत या पत्रासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
2
२. संदर्भाधीन पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेच्या घटना समोर येत असून समाजात याविषयी चिंता व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षा आणि शिक्षक-विद्यार्थी नाते बळकट करण्यासाठी सकारात्मक शिस्त ही संकल्पना आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हे, तालुके अथवा केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदांमध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर किमान ४५ मिनिटांचे विशेष सत्र आयोजित करण्यात यावे, असे मा. मंत्री महोदय (शालेय शिक्षण) यांचे निर्देश आहेत. या पत्रामध्ये मार्गदर्शन सत्रामध्ये भर द्यावयाचे नऊ मुद्दे नमूद करण्यात आले आहेत.
संदर्भाधीन पत्रासोबत अधिक माहितीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विकसित केलेल्या मुख्याध्यापक मार्गदर्शिका भाग दोन यामधील ‘सकारात्मक शिस्त- एक आव्हान’ हा लेख जोडण्यात आला असून, या लेखाचा आधार घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.
सदर परिषदांचे संक्षिप्त अहवाल दोन दिवसांच्या आत शासनास सादर करण्यात यावेत. यामध्ये या विषयावर जिल्हानिहाय आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण परिषदांची संख्या, सहभागी एकूण शिक्षकांची संख्या, महत्वाची छायाचित्रे, वैशिष्ट्यपूर्ण बातम्या यांचा समावेश असावा.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
३. संदर्भाधीन पत्रामधील सूचनांनुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी, ही विनंती.








