संस्काराचे मोती “प्रेरणादायी विचार” motivational thoughts
*आयुष्यात व्यवहार तर खुप होतात, पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही. कधीच कोणावर अवलंबून राहु नका, जे करायचं आहे ते स्वतःच करून दाखवा. दुसर्यावर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो.
*खरे सौंदर्य हे हृदय आणि गुणांमध्ये असते. पण लोक ते नाहक रूप आणि कपड्यांमध्ये शोधत असतात.*
*यशाजवळ पोहचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.*
*कधी कधी एकटेपणाची जाणीव होणे पण गरजेचं असतं. म्हणजे जबाबदारी पण जबाबदारीने सांभाळता येते.*
*धुर्त, कपटी माणूस समाजात खुप लोकांना फसवून स्वतःचे जिवन सुखाने जगत असला तरी तो स्वतःच्या कर्माला फसवू शकत नाही हा जन्माचा सिध्दांत आहे.*
*आयुष्यात आनंदी रहायचे असेल तर कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका, कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत शुन्य करून ठेवते.*
*वाढत वय हळूहळू कोवळ्यापणातून ते रंग, रुप, वेष धारण करत, आचार, विचार, सोबत घेत कोमेजल्या पासून ते अंगावर सुरकुत्या येईपर्यंत वाढत जात. बहुतेक हेच जीवन असावं.*
*अश्रूंचे वजन खूप असतं. म्हणून तर, डोळ्यातून ओघळले की मन हलकं होतं.*
*आपल्याशी एकनिष्ठ असणारी माणसं आपल्याकडून आपल्या वेळे व्यतिरिक्त दुसरं काहीच मागतं नाही.*
*आयुष्यात काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही हा यशाचा सिद्धांत आहे.*
*दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी, तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते.*
*फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणार्याला कळतो. माणसाची पारख ही त्याच्या रूपावरून करू नका. ती त्याच्या स्वभावावर अवलंबून असते. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही कळत नकळत काही तरी शिकवून जाते.*
*सौंदर्य स्वस्त आहे, चारित्र्य महाग आहे. घड्याळ स्वस्त आहे; वेळ महाग आहे. शरीर स्वस्त आहे; जीवन महाग आहे. मैत्री संबंध स्वस्त आहे; प्रामाणिकता महाग आहे, हाच मानवी ओळखीचा ताजा भाव आहे. तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी, कारण कुठलाच खोडरबर जिभेवर चालत नाही.*
*आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील साथ सोडून जाते.*
*कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंख हे नवे पंख देऊन जातात.*
*लोकांच बोलणं कधीच मनावर लावून घ्यायचं नसतं. लोकांचं काय, लोकं पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात खरे पण खातांना मात्र मीठ लावून खातात.*
*आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारखं असतं. कितीही दुःखी असलो तरी जगासमोर हसावच लागतं.*
*पैंजण जरी सोन्याचं असलं तरी, ते पायातचं घालतात. आणि टिकली जरी दोन रूपयांची असली तरी, कपाळीच लावतात. किंमतीवरून अस्तित्व ठरत नसतं, तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते.*
*ह्या जगात कुणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत पण, त्याच्या वागण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपलं आपण ठरवायचं.*
*समाधान हा आपल्या आयुष्यातील असा एक दागिना आहे की, आयुष्यभर मिरवला तरी त्याची चमक कधीच कमी होत नाही.*
*जीवनाने हसवलं तर समजायचं की, चांगल्या कामाचं फळ मिळालं आणि जीवनाने रडवलं तर समजायचं की, चांगलं काम करायची वेळ आली आहे. छोटसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा. जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात.
*जगात येताना आपणाकडे देह असतो नाव नाही, जग सोडताना मात्र नाव असतं देह नाही. मिळालेल्या देहाचे नावात रुपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य.*
*लक्षात ठेवा, दहा चांगल्या कामांपेक्षा एक वाईट काम जास्त काळ आठवणीत ठेवले जाते. निर्णयाची घाई असलेल्या माणसांशी चर्चा करताना. अगदीच सुरक्षित वाटत नाही. मित्र गरज म्हणून नाही, तर सवय म्हणून जोडा. कारण गरज संपली जाते, पण सवयी कधीच सुटत नाहीत.*
*भिंतीमधल्या सगळ्या विटा जेंव्हा एकमेंकात एकरूप होतात, तेंव्हाच ती भींत भक्कम आणि मजबूत बनते. एखाद्या विटेला जरी गर्व झाला की माझ्यामुळे भींत उभी आहे, पण ते चुकीचं आहे. प्रत्येक वीट महत्वाची असते. तसंच तुम्ही जेंव्हा एखाद्या प्रवाहात, समूहात काम करता, तेंव्हा सुद्धा प्रत्येकाने समर्पण केलं तरच ते काम यशस्वी होतं. माझ्यामुळं हे चाललय असं वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. संघटनेपेक्षा व्यक्ती कधीच मोठा नसतो. किंमत एकीला असते एकाला नाही.*
*जोपर्यंत आपण थोडे तिरके होत नाही, तोपर्यंत काही लोकं सरळ होत नाही.*
*माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी, नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो.*
*ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना करावा लागतो, तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवतो.*
*कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अति सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले, त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही.*
*जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं. तर उशिरा मिळणारे यश, आपलं व्यक्तिमत्व तयार करतं.*
*लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.*
*समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजदार होत नाही. ज्याचे मन सुंदर त्याचे ध्येय सुंदर असते, ज्यांचे विचार सुंदर असतात त्यांचे वागणे बोलणे आणि जगणेही सुंदर असते.*
*आयुष्यात ज्या कामाची भीती वाटते ते काम नक्की करा कारण, भीती तुम्हाला संकटावर मात करायला शिकवते.*
*सकाळ म्हणजे भुतकाळाच्या वलयातून बाहेर येण्याची आणि भविष्य सुंदर करण्याची एक संधी. या संधीचा चांगला वापर करण्यासाठी स्वच्छ विचार, निर्मळ मन आणि मुखावर स्मित हास्य असावे, स्वतः सोबत समोरच्या व्यक्तीचा दिवस देखील छान जातो.*
*अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात, आणि वाचली तर अधिक समजतात.*
*प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसुन उडवायला शिका. म्हणजे काळजाला बोचणार्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नाही.*
*गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लावतो, परिस्थिती ऐकायला लावते.*
*आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही, तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड, कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही.
*कोणतीही गोष्ट असो बोलून दाखवल्या शिवाय डोक्यावरील ताण कमी होत नाही आणि बोललेली गोष्ट पुढल्या व्यक्तीने समजून घेतल्या शिवाय मनाला शांती मिळत नाही. संवाद साधल्यामुळे मनातील गोष्टी समजतात व समजून घेतल्यामुळे अनेक गैरसमज दूर होतात. म्हणून नात्यात संवाद साधणे खूप गरजेचे. त्यामुळे एकमेकांच्या समस्या, अडचणी, सुख, दुःख अशा अनेक गोष्टी कळून येतील व नाते अजून घट्ट बनतील.*
*जीवनात येणारे सुख-दुःखाचे, यश अपयशाचे क्षण, आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात.*
*पुण्य करायचा कितीही प्रयत्न केला तरीही त्यातून नेहमी पाप घडत असतं आणि आपल्या हातून नक्की पुण्य किती घडतं याची गणती कोणाकडेच नसते. काही पुण्य असेही करायचे असतात की, ज्याचा साक्षीदार त्याच्या शिवाय दुसरा कोणीच नसावा.*
*कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो, तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा. नेहमी लक्षात ठेवा. करोडो लोक झोपेत असतात म्हणुन सुर्य आपला विचार कधीही बदलत नाही. सुर्योदय हा होतोच.*
*अपयशाच्या भितीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका. एखाद्या जीवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे रहा. जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि हरलात तरी त्याच्यासाठीच.*
*हक्क सांगायला सर्वांत पुढे असणारा माणुस, कर्तव्य करायला मात्र सर्वांत मागे असतो.*
*योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे मौन पाळणं नेहमीच संकटाना दुर ठेवायला मदत करते.*
*दुसर्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैश्याची गरज नसते.*
*फक्त मनात चांगली भावना लागते.*
*आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर, समोरच्या कडून अपेक्षा करणं सोडून द्या.*
*कारण अपेक्षाभंगामुळे आलेले नैराश्य फार कठीण असते.*
*नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे, जी गोष्ट आपल्या नशिबात नसते, तीच गोष्ट आपल्या नजरेला हवी असते.*
*लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं. पण हे खरं नाही. कारण नातं हे समोरच्याला मनापासून टिकवायचे असेल तरच टिकतं*
*शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की, त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल.*
*भूक लागली म्हणून, भाकरी ऐवजी पैसा खाता येत नाही. आणि पैसा जास्त आहे म्हणून, भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे.*
*मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात पण कर्माचा वारस आपण स्वतः असतो.*
*जन्माला येणं आणि मरून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं अस नाही तर, जन्माला येणं आणि इतरांपेक्षा काही तरी वेगळं करून जाणं, म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं.*
*जबाबदार व्यक्तीला बेभानपणे वागता येत नाही. मन कितीही ओढ घेत असलं तरीही संस्कारांच्या चौकटीत राहूनच आनंद उपभोगायला लागतो.*
*खऱ्या कारणांसाठी खोट्या लोकांशी संबंध तोडले तरी चालतील, पण खोट्या कारणांसाठी खऱ्या लोकांशी कधीही संबंध् तोडू नका.*
*चुकीचे वागल्यावरचं शिक्षा मिळते असे काही नाही, कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते.*
*जीवनात एवढे व्यस्त रहा कि, पश्चात्ताप, दुःख, भिती आणि कोणाचा व्देष करायला वेळच मिळायला नको.*
*कारण दुःखी तीच व्यक्ती असते जी रिकामी असते
*अपमान करणं स्वभावात असू शकत, पण सन्मान करणं संस्कारात असावं लागत. दुसऱ्यांच्या दोषाचं वर्णन तुमच्याकडे करणारे लोक, तुमच्या दोषाचे वर्णन तिसऱ्याकडे करतात हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.*
*छोट्या छोट्या प्रसंगांना भरभरुन जगल कि आनंदाची मोठ्ठी साखळी तयार होते.*
*हाताला न लागणाऱ्या स्वप्नांच्याही पाठीशी थोडं धावून बघावं, आयुष्य अजुन सुंदर वाटतं.*
*आयुष्यातील जबाबदारी नावाच्या ओझ्याला Forward करायचा Option नसतो.*
*समाजाला एक पांढरा केस शंभर काळ्या केसांहून आधी दिसतो, समाज त्याला जे आधी पहायचं असतं तेच पाहतो. ज्याला काय आधी पहावं हे कळतं तो देखणा आणि ज्याला पाहण्याआधी पारखून मत बनवावं वाटतं तो खरा सुशिक्षित.*
*माणसातील देव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहाय्यासाठी कधीच धावून येत नाही, तो एखाद्या देव माणसाची आपल्या मदतीसाठी योजना करतो. हेच सत्य*
*स्वतःचा दिवा विझलेला असतो*
*तरी सुद्धा*
*दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे, पाहणारे लोक अधिक सापडतात.*
*माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात पण समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळविण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते.
*यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना, भुतकाळातला पश्चाताप, आणि भविष्यकाळाची काळजी सोडली कि, वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो.*
*दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करुन त्यावर स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करुन, विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील.*
*नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपल्यांनी पण आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं.*
*वेळे अभावी संगत तुटली तर तुटू द्यात पण संवाद तुटला नाही पाहिजे. संवाद हा चांगल्या नात्याची रक्तवाहिनी असते.*
*कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करु नका. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो.*
*सोनं अंगावर घातले म्हणजे, माणूस मौल्यवान होतो असे नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असायला हवी.
*कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही तर त्याला सहनशक्तीचीही जोड आसावी लागते.*
*माणुस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे, ह्याला महत्व असतं कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं*
*सगळेच सुंदर असतात कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचं रूप पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्वाचं. देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे.*
*समाधानी व्हायचं असेल तर, जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असोत वा दूरचे.*
*नशीब हे आळशी लोकांसाठी असतं. यश हे फक्त मेहनती लोकांसाठी असतं.*
*आपल्याला होणारा सर्वांत मोठा आनंद म्हणजे, आपण समोरच्या व्यक्तीला बरोबर ओळखणं की हाच तो असावा. कारण त्यात आपल्या आत्मपरिक्षणाची तृप्ती असते, म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ.*
*आयुष्यात आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचे खर तर आपण आभार व्यक्त केले पाहिजेत, कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं आणि कसं जगायचं हे आपल्याला अचूकपणे शिकायला मिळतं.*
*मन असो किंवा मिठाई जर गोडवा नसेल, तर माणूसच काय मुंगी सुद्धा जवळ येत नाही.*
*जीवनात ज्याला शब्द समाजतात भावना समजतात, तो वेळ पाळतो. आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो.*
*कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुध्दा कमाई मध्येच मोजले जातात.*
*प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्राची व्हायला हवी. कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात. पण चांगले चारित्र बनवायला संपूर्ण आयुष्य.*
*धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात.*
*गाठ कशीही असली तरी सोडविता येते. प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं भेटल्यावर उभा राहतो.*
*कमी वयात माणुस समजदार असाच नाही होत, काहींना लोक समजदार बनवतात, तर काहींना परिस्थिती. आणी समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात.*
*कितीही चांगल्या शब्दांचा सुविचार असु दे, चेह-यावर हसू, नजरेत आपुलकी, आणि हृदयात प्रेम नसेल/ तर सर्व व्यर्थ आहे.*
*संयम ठेवा संकटाचे हे ही दिवस जातील, आज जे तुम्हाला पाहून हसतात, ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.
*जमा करुन ठेवायचंच तर लोकांचे आशिर्वाद, कुणाचा तळतळाट नाही. कारण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने खाऊ देत नाही.*
*जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवायचे मनाप्रमाणे झाले तर, ईश्वराची कृपा. मनाविरूध्द झाले तर, ईश्वराची ईच्छा. दोन्हीमधे आपल्याला समाधान नक्की मिळणारच.*
*कोण हिशोब ठेवणार कोणाला किती दिले. आणि कोणी किती वाचवले. म्हणुन सोपा उपाय केला, सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले अन् रिकाम्या हातानेच बोलावले.*
*दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते, जे प्रामाणिकपणे सरळ साधे सरळ आयुष्य जगत असतात.*
*आपलं काही दुखत असतं आपण कळवळतो तेव्हा होते ती वेदना परंतु दुसऱ्याचं दुखणं पाहून जेव्हा आपण कळवळतो ती संवेदना.*
*अपयशाच्या भितीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका. एखाद्या जीवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे रहा. जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि हरलात तरी त्याच्यासाठीच.
*चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं तो पाहून घेईल, हा विश्वास मनात असला, कि येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल.*
*सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसु देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही.*
*विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की, भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाही, तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करतात.*
*दुसऱ्याची विचारपूस करणे, ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते.*
*आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे, तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भिती बाळगण्याची गरज नाही.*
*दुस-यांची मदत करण्यासाठी कोणाकडे ही वेळ नसतो. परंतु दुस-यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वाकडे वेळ असतो, एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही, जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते.
*जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं लागतं हे सांगाव लागत नसतं.*
*संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी. जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते.*
*आयुष्याकडे इतक्या सुंदरतेनं बघितलं की. आयुष्यही इतकचं मनमोहक दिसायला लागतं. जगण्याची धून सापडली की आयुष्याची रंगत वाढते.*
*विचाराच्या पावित्र्यातुनच संबंधात गोडी निर्माण होते. मन शुद्ध असल्यास दुसऱ्याबद्दल कधी वाईट विचार येत नाहीत.*
*आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील महत्वाचा घटक आहे, तो गुंतवणूकीसारखा आहे. जेंव्हा आपण इतरांना देतो तेंव्हा त्याची परतफेड दुपटीने होत असते.*
*कपडे नाही माणसाचे विचार Branded पाहिजे,*
*गाठ कशीही असली तरी सोडविता येते. प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं भेटल्यावर उभा राहतो.*
*कमी वयात माणुस समजदार असाच नाही होत, काहींना लोक समजदार बनवतात, तर काहींना परिस्थिती, आणी समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात.*
*अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहत नाही.*







