सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करणेबाबत ashwasit pragati yojana 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करणेबाबत ashwasit pragati yojana 

संदर्भ :-

१) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. वेतन १९९९/प्र.क्र.२/सेवा.३. दि.२०.७.२००१

२) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. वेतन ११०९/प्र.क्र.४४/सेवा.३. दि. १.४.२०१०

३) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. वेतन १११९/प्र.क्र.३/सेवा.३. दि. २.३.२०१९

४) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयचे पत्र क्र. प्रविस्था-१२(२०२४)/आ.प्र.गडेकर/का-१/२१८६, दिनांक २३.०९.२०२५

Pdf download

शासन आदेश :

वित्त विभागाच्या संदर्भ क्र.३ येथील दि.०२.०३.२०१९ च्या शासन निर्णयान्वये १०, २० व ३० वर्षांच्या नियमित सेवेनंतरची, तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दि.०१.०१.२०१६ पासून लागू करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या दि.०२.०३.२०१९ च्या शासन निर्णयान्वये अधिकाऱ्यांना १०, २०, व ३० वर्षांच्या नियमित सेवेनंतर पहिला, दुसरा व तिसरा लाभअनुज्ञेय करण्याची तरतूद आहे.

२. उपरोक्त तरतूदीनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील आश्वासित प्रगती योजनेंतर्गत त्यात नमूद केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या “वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा माहिती अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक (माहिती) / जनसंपर्क अधिकारी, गट-अ (कनिष्ठ),” संवर्गातील सोबतच्या यादीत परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्याला तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभ मंजूर करण्यात येत आहे. परिशिष्ट-अ मधील अधिकाऱ्याला गट-अ (वरिष्ठ), एस २३ ६७७००-२०८७०० ही वेतनश्रेणी मंजूर करण्यात येत आहे.

३. परिशिष्ट-अ मधील सेवानिवृत्त श्री. प्रेमचंद जिनदास गडेकर या अधिकाऱ्याची ५०/५५ पुनर्विलोकनाची कार्यवाही झालेली नाही. मा. अध्यक्ष, विभागीय पदोन्नती समिती यांच्या निदेशानुसार उपरोक्त अधिकाऱ्याला सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

४. या आदेशाच्या अनुषंगाने वरिष्ठ वेतनश्रेणीमध्ये वेतननिश्चिती करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने सदर आदेशाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत विकल्प द्यावा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अधिकाऱ्याच्या ज्या पदाची वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावयाची आहे त्या पदाच्या वेतन संरचनेतील वेतननिश्चिती त्यांनी दिलेल्या विकल्पानुसार करुन त्यांना या योजनेचा लाभ त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांक व वेतन संरचनेनुसार देऊन त्यांची वेतननिश्चिती करण्यात यावी.

4. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२५१२२२१३०४२४३८०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

शासन परिपत्रक pdf download

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्य आदेशानुसार व नावाने.

Related posts:

Leave a Comment