स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमधील अंशकालीन निदेशकांच्या मानधनासाठी राज्य हिस्स्याचा निधी वितरित करणेबाबत anshkalin nideshak mandhan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमधील अंशकालीन निदेशकांच्या मानधनासाठी राज्य हिस्स्याचा निधी वितरित करणेबाबत anshkalin nideshak mandhan 

वाचा :-

१) राज्य प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा), महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र, क्र. मप्राशिप/सशि/अं.नि./२०२५-२६/३३५७, दि.१२.११.२०२५.

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्र. पूरक २०२५/प्र. क्र. ८२ (ई-११५०७५६), दि.२०.१०.२०२५.

३) राज्य प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा), महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र, क्र. मप्राशिप/सशि/अं.नि./ २०२५-२६/२८९५, दि.२५.०९.२०२५.

४) राज्य प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा), महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र, क्र. मप्राशिप/सशि/अं.नि./२०२५-२६/२४९३. दि.१२.०८.२०२५.

५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय समक्रमांक, दि. ०५.०६.२०२५.

६) वित्त विभाग, शासन परिपत्रक, क्र. अर्थसं २०२५/प्र.क्र.४४/अर्थ-३, दि.०७.०४.२०२५.

७) शासन परिपत्रक, क्र. आरटीई २०२१/ प्र. क्र. ३०/ एसडी-१, दि.१४.१०.२०२४.

८) शासन पत्र, क्र. आरटीई २०२१/ प्र. क्र. ३०/ एसडी-१, दि.२८.०६.२०२४, दि. १६.०७.२०२४ व दि.१९.०७.२०२४.

प्रस्तावना :-

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र. ८७८६/२०२१ प्रकरणी दि. ०२.०४.२०२४ व दि.०८.०५.२०२४ रोजी पारित केलेल्या आदेशांनुसार न्यायालयीन प्रकरणात सहभागी असलेले व न्यायालयीन प्रकरणाबाहेरील अंशकालीन निदेशकांना मानधन अदा करण्यासाठी शासन निर्णय, दि. ०५.०६.२०२५ अन्वये निधी वितरित करण्यात आलेला आहे.

२. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी संदर्भ क्र. १, ३ व ४ अन्वये शासनास सादर केलेल्या अहवालानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये उशिरा रुजू झालेल्या तसेच, तांत्रिक कारणास्तव मानधन अदा न झालेल्या अंशकालीन निदेशकांचे मानधन अदा करण्यासाठी एकूण रु.८९,९३,७५८/- इतका निधी आवश्यक असल्याचे कळविले आहे. सदर निधी मागणी क्र. ई-२, (२२०२ आय ६१२), ३१-सहायक अनुदाने (राज्य हिस्सा ४० टक्के) या लेखाशिर्षाखाली उपलब्ध असणाऱ्या निधीतून वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :-

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये उशिरा रुजू झालेल्या तसेच, तांत्रिक कारणास्तव मानधन अदा न झालेल्या अंशकालीन निदेशकांचे मानधन अदा करण्यासाठी रु. ८९,९३,७५८/- (रुपये-

एकोणनव्वद लाख त्र्यान्नव हजार सातशे अठ्ठावन्न फक्त.) इतका निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक परिषद, मुंबई यांना वितरित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२. अंशकालीन निदेशकांच्या मानधनाची रक्कम बँक खात्यातच जमा करावी. याबाबत कोणतीही अनियमितता होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी.

३. कार्यरत अंशकालीन निदेशकांचे मानधन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा. शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्वमान्यता घेण्यात यावी. वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावे.

४. सदर खर्च “मागणी क्र. ई-२, २२०२ सर्वसाधारण शिक्षण, ०१ प्राथमिक शिक्षण, १०६-शिक्षक व इतर सेवा, (००) (००) (०१) समग्र शिक्षा अभियान (सर्वसाधारण) (राज्य हिस्सा ४० टक्के) (२२०२ आय ६१२) (कार्यक्रम), ३१-सहायक अनुदाने (वेतनेतर)” या लेखाशिर्षाखाली सन २०२५-२६ या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा.

५. सदर निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेकडे सुपूर्द करण्यात येत आहे. सदर निधी आहरित करून वितरित करण्यासाठी अवर सचिव/ कक्ष अधिकारी (रोख शाखा/ लेखा शाखा), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “आहरण व संवितरण अधिकारी” तर सह सचिव/ उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी निधी कोषागारातून आहरित करुन समग्र शिक्षा योजनेच्या SNA खात्यात जमा करावा. सदर निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी जिल्हा परिषद/महानगरपालिकानिहाय वितरित करावा. वितरित केलेल्या निधीचा तपशिल शासनास सादर करावा.

६. वित्त विभाग, शासन परिपत्रक दि.०७.०४.२०२५ मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे. सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरिताच्या अटी व शर्ती या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत.

७. सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र. ११४२/व्यय-५, दि. ०४.१२.२०२५ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५१२३११५५२३९९८२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

शासन परिपत्रक pdf download

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment