महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२५ प्रसिद्धी निवेदन सूचना teacher eligibility test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२५ प्रसिद्धी निवेदन सूचना teacher eligibility test 

उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ चे आयोजन दिनांक २३.११.२०२५ रोजी करण्यात आलेले आहे. सदर परीक्षेसाठी राज्यभरातील ३७ जिल्हास्तरावर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण १४२३ केंद्र निश्चित केले आहेत.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ परीक्षेचे आयोजनाची कार्यवाही सुरू असून, परीक्षेसंबंधित कार्यवाहीबाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती व सूचना देण्यात येत आहेत.

परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची/उमेदवारांची सांखिकिय माहिती पुढील प्रमाणे,

सदर परीक्षा पेपर १ साठी ५७१ केंद्र तर पेपर २ साठी ८५२ केंद्रावरील प्रत्येक वर्गखोली व परिसरात CCTV कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सुरक्षा तपासणीसाठी अनुषंगीक सुविधा दिलेल्या आहेत. सदर सुविधांचा तपशिल खालीलप्रमाणे :-

*१. Frisking (HHMD): –

परीक्षा केंद्रात प्रवेश करताना परीक्षेच्या कामकाजामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व परीक्षार्थी (दिव्यांग उमेदवारांचे लेखनिकासह) यांचे मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने Frisking केले जाणार आहे. परीक्षार्थींनी इलेक्ट्रॉनिक साहित्य उदा. मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर इत्यादी उपकरणे परीक्षा केंद्रात जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.

२ . परीक्षार्थी यांचे बायोमेट्रीक, Face Recognition व तपासणी :-

परीक्षा केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी प्रत्येक परीक्षार्थीची हॅन्ड होल्ड मेटल डिटेक्टरच्या (HHMD) सहाय्याने तपासणी केली जाणार आहे. तसेच त्यांची (Biometric) बायोमेट्रीक घेतले जाणार आहे. प्रत्येक परीक्षाथ्यर्थ्यांचे Face Recognition केले जाणार आहे. आवेदनपत्राच्या मूळ डाटाबेसशी साधर्म्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसच प्रवेश दिला जाणार आहे. काही वेळा मूळ डाटाबेसशी विद्यार्थ्यांचे Face Recognition माहिती न जुळल्यास केंद्रसचांलकांनी प्रत्यक्ष व्यक्ती, त्यांचे आयकार्ड, प्रवेशपत्रावरील फोटो यांची खातरजमा करून ओळख पटल्यानंतर त्या परीक्षार्थीच्या प्रवेशाबाबत देण्यात येणार आहे. मूळ विद्याथ्यांऐवजी अन्य उमेदवार प्रवेश करत असल्याचे आढळल्यास त्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

३. CCTV कॅमेरे :-

सर्व परीक्षा दालनामध्ये, परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर व केंद्रसंचालकाच्या कक्षात CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सदर कॅमेऱ्यांचा Live Access शिक्षणाधिकारी कार्यालय व परीक्षा परिषदेत घेतला जाणार आहे, त्यामुळे सर्व परीक्षा दालनांवर जिल्हा व राज्यस्तरांवरून सनियंत्रण ठेवले जाणार आहे. सदर Access हा Artificial Intelligence Based असल्याने अत्यंत काटेकोरपणे हे सनियंत्रण होणार आहे. यामध्ये CCTV बाबत गैरकृत्य केल्यास, पर्यवेक्षकांनी वेळोवेळी परीक्षा कक्षात फेऱ्या न मारल्यास, विद्यार्थ्यांनी त्यांची बैठक व्यवस्था हलवल्यास अथवा परीक्षेच्या अनुषंगाने अनावश्यक हालचाली इत्यादी बाबी झाल्यास लगेचच सूचना जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षास व परीक्षा परिषदेस प्राप्त होणार आहे.

४. PHOTO VIEW:-

Photo View या सुविधेतील पहिली सुविधा म्हणजे Photo View मध्ये मागील केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मागील वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या सर्व महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ परीक्षांमधील उमेदवारांचे (Proxy Exam Prevention) फोटो व नावे आपल्या या परीक्षेमधील उमेदवारांसोबत पडताळणी करण्यात येणार (Historical Analysis) असून, एक उमेदवार व दोन वेगवेगळे फोटो (Morphed Photo Detection) किंवा एकच फोटो मात्र दोन वेगवेगळी नावे (Impersonation Prevention) असलेल्या उमेदवारांची यादी, तसेच एकाच

उमेदवाराने वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर अनेक आवेदनपत्र भरलेले असल्यास (Duplicate Application Prevention) अशा उमेदवारांची यादी आपल्याला परीक्षेपूर्वीच पडताळणीसाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे परीक्षेपूर्वी तसेच परीक्षेच्या वेळी देखील बोगस डमी विद्यार्थ्यांची ओळख तात्काळ करता येणार आहे,

4. CONNECT VIEW:-

Connect View मध्ये प्रत्येक परीक्षा केंद्रसंचालक, परीक्षा संनियंत्रण कक्ष व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कक्ष यांचेकडे हॉटलाईनचे फोन उपलब्ध असतील सदर सुविधेमार्फत आवश्यकतेनुसार संबंधितांशी संपर्क साधला जाईल व या फोनच्या माध्यमातून दिवसभर नियमीतपणे केंद्रसंचालकासाठी विविध सूचना एकाचवेळी निर्गमित करता येतील. दिलेल्या सुचनांचे (Broadcast) संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध असणार आहे. जेणेकरून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमधील पारदर्शकता व विश्वासार्हता कायम राहून परीक्षा शिस्तबध्द पद्धतीने घेण्यात येईल.

परक्षेसंबंधी युट्युब चॅनेल्स, सोशल मिडिया प्लेटफॉर्मद्वारे व प्रसार माध्यमाद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्या/अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://mahatet.in अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचना व माहितीचे अवलोकन करावे.

शासन परिपत्रक pdf download

Related posts:

Leave a Comment