पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपध्दतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत pavitra portal shikshak padbharti
शासन निर्णय :
खालील तक्त्यात दर्शविण्यात आल्याप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपध्दतीशी संबंधित काही अडचणी शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. या अडचणीच्या निवारणार्थ सुधारित तरतूदी लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
२. उपरोक्त बदल हे शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२५ नुसार करावयाच्या पदभरतीसंदर्भातील स्विकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातींसाठी तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी नुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहतील.
३. या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेल्या सुधारित तरतूदी ह्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करु इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागांच्या पदभरतीसाठी देखील लागू राहतील.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०१२०१२४१४०८७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,









