बालचित्रकला स्पर्धा-२०२५ balchitrakala spardha 

बालचित्रकला स्पर्धा-२०२५ balchitrakala spardha 

मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्याबाबत.

वरील विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, प्रतिवर्षी बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन कला संचालनालयाच्या अधिपत्याखाली निरीक्षक चित्रकला व शिल्प महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयामार्फत करण्यात येत होते. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम २०२३ (सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १२) महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक १९ जानेवारी, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम २०२३ या अधिनियमातील कलम-१, पोट-कलम (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन या अधिनियमाचा प्रारंभदिनांक २३ फेब्रुवारी, २०२४ नियत करण्यात आलेला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून बालचित्रकला स्पर्धा महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत आयोजित केली जाणार आहे.

सदर बालचित्रकला स्पर्धा २०२५ चे आयोजन मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषद/नगरपालिका/महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये इयत्तानिहाय ४ गटामध्ये (गट क्र. १ इयत्ता पहिली व दुसरी, गट क्र.२ इयत्ता तिसरी व चौथी, गट क्र. ३ इयत्ता पाचवी, सहावी व सातवी, गट क्र.४ इयत्ता आठवी, नववी व दहावी) एकाच दिवशी आयोजित करावयाची आहे.

बालचित्रकला स्पर्धेकरीता विद्यार्थ्यांकडून रु. २०/- (अक्षरी रुपये वीस फक्त) इतके शुल्क आकारण्यास नियामक परिषदेच्या बैठकीत मान्यता दिली आहे. बालचित्रकला स्पर्धा नियोजनाबाबत सविस्तर परिपत्रक स्वंतत्रपणे निर्गमित करण्यात येईल.

सदर बाब आपल्या अधिपत्याखालील सर्व शाळांच्या निर्देशनास आणावी.

Leave a Comment