जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्यासाठी मंजूर करण्यांत आलेल्या ४३ अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत bhavishya nirvah nidhi 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्यासाठी मंजूर करण्यांत आलेल्या ४३ अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत bhavishya nirvah nidhi

वाचा :-

१) शासन निर्णय, ग्रा.वि. व ज.सं. विभाग क्र. आयएमव्ही १०७९/ (सीआर-२४-अ)/२/४० दि. ०४/१२/१९८०.

२) शासन निर्णय वित्त विभाग क्र. टीईपी-२००२/प्र.क्र.१३/सेवा-३, दि. २१/०६/२००३.

३) शासन निर्णय, ग्रा.वि. व ज.सं विभाग क्र. जीपीएफ १००७/प्र.क्र.१२/आस्था-११ दि. ०८/०३/२००७.

४) शासन निर्णय, ग्रा.वि. व ज.सं विभाग क्र. जीपीएफ १००८/प्र.क्र.१३/आस्था-११ दि. २१/०२/२००८.

५) शासन निर्णय, ग्रा.वि. व ज.सं विभाग क्र. जीपीएफ १००९/प्र.क्र.२५/आस्था-११ दि. २५/०३/२००९.

६) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. भनिनि ६९२१/प्र.क्र.३८/आस्था-१० दि. २८/०२/२०२२.

७) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. भनिनि ६९२२/प्र.क्र.४५/आस्था-१० दि. ३१/०३/२०२२.

८) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. भनिनि ६९२३/प्र.क्र.३२/आस्था-१० दि. १२/०४/२०२३.

९) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. पदनि २०१६/प्र.क्र. ८/१६/आपुक दि. ३१/०८/२०२३.

१०) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. भनिनि ६९२३/प्र.क्र.३२/आस्था-१० दि. २५/०९/२०२३.

११) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. भनिनि ६९२३/प्र.क्र.३२/आस्था-१० दि. २९/०५/२०२४.

१२) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. पदनि २०१६/प्र.क्र. ८/१६/आपुक दि. ०६/०९/२०२४.

१३) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. भनिनि ६९२३/प्र.क्र.३२/आस्था-१० दि. २३/०९/२०२४

१४) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. पदनि २०१६/प्र.क्र. ८/१६/आपुक दि. ०३/०३/२०२५,

१५) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. भनिनि २०२५/प्र.क्र.१/वित्त-५. दि. १२/०३/२०२५.

१६) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. पदनि २०१६/प्र.क्र. ८/१६/आपुक दि. २६/०८/२०२५.

प्रस्तावना :-

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्याकरीता विभागाने संदर्भाधीन क्र. १ च्या शासन निर्णयान्वये एकूण १९९ पदांना मंजुरी दिली होती. त्यानंतर काही जादा पदे वगळून एकरीत २८३ पदांना शासन निर्णय दि. २२/०८/१९८३ अन्वये मंजुरी देण्यांत आली. त्यानंतर पुन्हा शासन निर्णय दि. ३०/०६/२००३ अन्वये मा. मुख्य सचिव समितीने दिलेल्या सहमतीनुसार जिल्हा परिषदांच्या भविष्य निर्वाह निधीच्या कामासाठी सुधारीत आकृतिबंधानुसार २८६ पदांना जिल्हा निहाय मंजुरी देण्यात आली. संदर्भाधीन शासन निर्णय दि.०८/०३/२००७ नुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्याकरीता मंजूर करण्यांत आलेल्या अस्थायी पदांना दि. ०१/०३/२००७ते दि. २९/०२/२००८ पर्यंत मुदतवाढ देण्यांत आली.

२. वित्त विभागाच्या दि. २८/०२/२००३ च्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, पदांच्या निश्चित करण्यांत आलेल्या सुधारीत आकृतिबंधानुसार २८६ पदांपैकी उप लेखापाल १२, वरीष्ठ सहाय्यक-४५, कनिष्ठ सहाय्यक- १५७ व परिचर-२९ अशा एकूण २४३ पदांना स्थायी करण्यांस व कनिष्ठ सहाय्यकांच्या २०० पदांपैकी (१५७ स्थायी पदे वगळून) ४३ अस्थायी पदांना उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये वेळोवेळी मुदतवाढ देण्यांत आली आहे. सदर कनिष्ठ सहाय्यकांच्या ४३ अस्थायी पदांना संदर्भाधीन क्र.१५ येथील दि. १२/०३/२०२५ च्या शासन निर्णयान्वये दि. ०१/०३/२०२५ ते दि. ३१/०८/२०२५ या कालावधीकरीता यापूर्वी शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे.

३. वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र.१६ येथील दि. २६/०८/२०२५ च्या शासन निर्णयास अनुसरुन, प्रस्तुत कनिष्ठ सहाय्यकांच्या ४३ अस्थायी पदांना दि.०१/०९/२०२५ ते दि.२८/०२/२०२६ या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

१. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्याकरीता सोबतच्या प्रपत्रानुसार मंजूर करण्यांत आलेल्या कनिष्ठ सहाय्यकांच्या ४३ अस्थायी पदांना दि.०१/०९/२०२५ ते दि. २८/०२/२०२६ या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यांत येत आहे.

२. या पदांच्या वेतन व भत्ते यासाठी होणारा खर्च मागणी क्र. एल-२, २०५३-जिल्हा प्रशासन ०९३/जिल्हा आस्थापना (५) स्थानिक क्षेत्राातील योजना महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम १८३ अन्वये जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदाने, (०५) (०१) जिल्हा परिषदांना अनुदाने (आस्थापना अनुदान) सुधारीत कर्मचारी रचना पध्दती (अनिवार्य) (२०५३०५६५), ३६ सहायक अनुदाने (वेतन)” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यांत येऊन चालू वर्षासाठी उपलब्ध झालेल्या तरतुदीतून भागविण्यांत यावा.

३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय दि. २६/०८/२०२५ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५११०३११५१३९३९२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

शासन परिपत्रक pdf download

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment