मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या नियुक्तीबाबत block level officer

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या नियुक्तीबाबत block level officer

संदर्भ :- भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र.23/BLO/2025-ERS, दि.०५.०६.२०२५

महोदय,

भारत निवडणूक आयोगाच्या उपरोक्त संदर्भाधिन पत्राची प्रत सोबत जोडली आहे.

२. भारत निवडणूक आयोगाने उपरोक्त संदर्भाधिन पत्रान्वये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या नियुक्तीसंदर्भात खालील सुचना निर्गमित केल्या आहेत.

१.१ मतदार यादीतील प्रत्येक भागासाठी निवडणूक निर्णय अधिकारी (ERO) यांनी “लोकप्रतिनिधीत्य अधिनियम, १९५०० च्या कलम १३ब (२) अंतर्गत, त्या यादी भागातील (Electoral Roll Part) मतदार म्हणून नोंदणीकृत असलेल्या राज्य शासनाच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गट क आणि त्यावरील नियमित सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांमधून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नेमणूक करण्यात यावी.

१.२ जर अशा नियमित राज्य किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांची उपलब्धता नसेल, तर मतदार नोंदणी अधिकारी हे अंगणवाडी सेविका, कंत्राटी शिक्षक किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी यांच्यांमधून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची नेमणूक करु शकतील. मात्र अशा परिस्थितीत, मतदार नोंदणी अधिकारी यांचे स्वाक्षरी असलेले आणि जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO) यांच्याकडून प्रमाणित केलेले अनुपलब्धता प्रमाणपत्र (Annexure-१) मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) यांना सादर करणे आवश्यक राहील.

१.३ वरील नमूद केलेल्या वर्गातील (Category) कर्मचारी जर त्या मतदार यादी भागातील मतदार म्हणून नोंदणीकृत नसतील, तर त्या मतदार यादी भागात कार्यरत असलेल्या (Working in area covered by that part of Electoral Roll) इतर कर्मचाऱ्यांमधून BLO नेमणूक करता येईल, परंतु त्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांची पूर्व मान्यता घेणे आवश्यक आहे.

१.४ वरील प्रकरणां व्यतिरिक्त इतर प्रकरणी BLO ची नेमणूक करण्यापूर्वी भारत निवडणूक आयोगाची पूर्व मान्यता घेणे आवश्यक आहे.

वरील सूचना विचारात घेऊन खालील प्रमाणे कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.

१) उपरोक्त परिच्छेद २ च्या १.१ प्रमाणे प्रत्येक मतदान केंद्राकरीता आयोगाच्या सूचनांनुसार मतदान केंद्र अधिकारी (BLO) यांची नियुक्ती करण्याची कार्यवाही दिनांक १५.०६.२०२५ पर्यंत पूर्ण करण्यात यावी.

२) परिच्छेद २ च्या १.२ प्रमाणे आवश्यकते नुसार प्रमाणपत्र (Annexure-1) या कार्यालयास दि.१५.०६.२०२५ पर्यंत सादर करण्यात यावे.

३) परिच्छेद २ च्या १.३ येथील प्रकरणांच्या अनुषंगाने या कार्यालयाच्या मान्यतेसाठीचे प्रस्ताव दि. १२.०६.२०२५ पर्यंत सादर करण्यात यावेत.

४) परिच्छेद २ च्या १.४ नुसार भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेस सादर करावयाचे प्रस्ताव (असल्यास) अशी प्रकरणे या कार्यालयाकडे इंग्रजीमध्ये दिनांक १२.०६.२०२५ पर्यंत सादर करण्यात यावीत.

Related posts:

Leave a Comment