परीक्षा केंद्रावरील CCTV कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग जतन करून ठेवणेबाबत cctv camera recording
संदर्भ:- १. राज्यमंडळ कार्यालयाचे क.रा.मं. परीक्षा-८/३२६९ दि.२५/०९/२०२५ रोजीचे पत्र.
२. शासन पत्र क्रमांकः- परीक्षा-१६२५/प्र.क्र.१३/एसडी-२ दि. ०३ डिसेंबर, २०२५
३. राज्यमंडळ कार्यालयाचे कमांक.रा.मं./ परीक्षा-५/४१३२ दि.०५/१२/२०२५ रोजीचे पत्र.
४. शासन निर्णय क्र. परीक्षा १६२५/प्र.क्र.२२१/एस.डी.२ दि.०९.०१.२०२६
५. शासन पत्र क्रमांकः- परीक्षा-१६२५/प्र.क्र.१३/एसडी-२ दि. ३० जानेवारी, २०२६.
६. राज्यमंडळ कार्यालयाचे क.रा.मं./ परीक्षा-५/४३७ दि.३०/०१/२०२६ रोजीचे पत्र.
उपरोक्त संदभीय पत्रान्वये परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, शिस्त व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठो सर्व परीक्षा केंद्रांमध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यावाचत विभागीय मंडळांनी केंद्रसंचालक बैठकीमध्ये सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दिनांक १० फेब्रु., २०२६ ते दिनांक १८ मार्च, २०२६ तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा दिनांक २० फेब्रु २०२६ ते दिनांक १८ मार्च, २०२६ या कालावधीत होत आहेत. उपरोक्त कालावधीतील परीक्षा केंद्र परीसरातील व परीक्षेशी संबंधित वर्गखोल्या तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) / सामान्यज्ञान (GK) विषयांच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान संगणक प्रयोगशाळेतील CCTV कॅमे-यांचे फुटेज जतन करुन ठेवणे अनिवार्य असून त्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. रेकॉर्डिंग व संचयन (Storage) व्यवस्था:
१. परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा कक्षातील कॅमेऱ्यांचे किमान ३० मिनिटे व परीक्षा संपल्यानंतर (दिव्यांग विद्याधी असलेस त्या कालावधीचा विचार करुन) रेकॉर्डिंग सुरू ठेवणे बंधनकारक राहील. परीक्षा केंद्रावरील DVR/NVR मधील प्रत्येक पेपर दिवशीचे रेकीडींग स्वतंत्र पेनड्राईव्ह / संगणकाचर जतन करुन ठेवावे, फुटेज साईज (Data) अधिक असल्यास हार्डडिस्कमध्ये ते जतन करुन ठेवावे. रेकॉडींग जतन करत असताना आयटी शिक्षक किवा तंत्रस्नेही शिक्षकाची मदत घ्यावी.
२. सर्व कॅमेरे सतत Continuous Recording Mode वर ठेवावेत. Motion Recording टाळावे.
३. DVR/NVR मध्ये पुरेशी हार्डडिस्क क्षमता किमान १ TB किंवा आवश्यकतेनुसार अधिक असावी. क्षमता कमी असल्यास DATA वगळला जाण्यापूर्वीच वेळोवेळी Hard Disk किंवा संगणकामध्ये त्या दिवसापर्यंतथा डाटा साठवून घ्यावा.
४. केंद्रावरील सर्व पेपरच्या दिवशीचे unedited रेकॉर्डिंग पेनड्राईव्ह अथया संगणकावर, तसंच आवश्यकतेन्मार हार्डडिस्कमध्ये पुढील आदेशापर्यंत जतन करुन ठेवावे. विभागीय मंडळ अथवा जिल्हा दक्षता समितीने मागणी केल्यास तात्काळ ने उपलव्ध करून द्यावे.
५. आवश्यकतेनुसार बैंकअप External Hard Disk / Cloud Storage देवणे बंधनकारक राहील.
६. परीक्षा कालावधीन परीक्षा केंद्रावरीन CCTV चे live access जिल्ला दक्षता मिलो / बांरष्ठ कार्यालय तसेच मंडळाने मागणी केल्यास परीक्षा केंद्रांनी ते उपलव्ध करुन देणे अनिवार्य आहे.
७. दररोज पेपर सुरु होण्यापूर्वी आणि वेळोवेळी रार्न CCTV कैमरे सुरु आहेत यायावत केंद्रसंचालकांनी साधी करावी.
८. परीक्षा केंद्रास भेट देणान्या अधिकारी, भरारी पथक, पेठे पथक यांना CCTV कैमरे व यंत्रणा कार्यान्वित असल्याबाबत केंद्रसंचालकांनो अवगत करावं.
९. परोक्षा कालावधीत परीक्षा केंद्र परिसर च वर्गखोल्यांमधील CCTV कैमेरे चंद असणे, बंद ठेवणे, access उपलब्ध करुन न देणं, फुटेज न ठेवणे अथवा उपलब्ध करुन न देणे या चाची गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने फल्याच मानण्यात येईल. यावायत संबंधित केंद्राचे प्राचार्य, केंद्रसंचालक, केंद्रसमन्वयक यांच्यावर जवायदारी निश्चित करुन गैरमार्ग प्रतिबंध अधिनियम १९८२ अंतर्गत गैरप्रकार करणे, गैरप्रकारास मदत करणे आणि उत्तेजन देणे या कलम क्र. ०३ अन्वये कारवाई करण्यात येईल.
वरील सर्व सूचनांचे काटेकोर पालन करणे ही परीक्षा केंद्रसंचालकांची व संबंधित परीक्षा केंद्र शाळा । कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक / प्राचार्य व केंद्र समन्वयक यांची वैयक्तिक जयायदारी राहील. कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल असे आपल्या स्तरावरून संबंधितांना कळविण्यात यावे.
वरील सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयाम
सादर करावा.
(मा. अध्यक्ष यांचे मान्यतेने)









