19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोपे मराठी भाषण chatrapati shivaji maharaj jayanti bhashan
हवा हवेपेक्षाही त्यांचा वेग होता। वेगाने नव्हती,
अन्यायाविरुध्द लढण्याचा, इरादा नेक होता।
असा जिजाऊंचा शिवबा, लाखात एक नाही तर ….
जगात एक होता !
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर
वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र –
मैत्रिणीनों….
माझे नाव वरद अहि. सर्वांना माझा नमस्कार !
आज मी आपणासमोर महाराष्ट्राच्या आस्मतेचे, शौर्याचे आणि स्वाभिमानाचे तेजस्वी सूर्य छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा सांगण्यास उभा आहे.
१९ फेब्रुवारी १६३० हा सोन्याचा दिवस. या मंगलदिनी माता जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. ती सिंह म्हणजेच छत्रपती शिवाजी राजे भोसले होय.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योध्दे नव्हते, तर दूरदृष्टी असलेले कुशल प्रशासक आणि प्रजेचे खरे रक्षक होते.
लहान वयातच त्यांनी अन्यायाविरुध्द उभं राहण्याची हिंमत दाखवली आणि हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून माता जिजाऊंचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी मावळ्यांसीबत शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूचा पराभव केला.
महाराजांनी स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नव्हे, तर न्याय, समानता आणि स्वाभिमान असल्याच शिकवलं. त्यांच्या राज्यात गरीब श्रीमंत. जात – धर्म यांमध्ये भेद नव्हता.
स्त्रियांचा सन्मान, शत्रूप्रतीही माणुसकी आणि प्रजेवर अपार प्रेम ही त्यांच्या राज्यकारभाराची ओळख होती.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपली.
ओळख, आपला अभिमान आणि आपली प्रेरणा आहेत.
राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिववासमान मात्र कुणी न झाला!
गर्व ज्यांचा असे या महाराष्ट्राला, एकची तो शिवबा होऊनी गेला.
अशा या शूर – पराक्रमी राजास माझे कोटी – कोटी प्रणाम ।।
जय जिजाऊ ! जय शिवाजी ।
॥ धन्यवाद ।।







