छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रेरणादायी मराठी भाषण chatrapati shivaji maharaj jayanti bhashan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रेरणादायी मराठी भाषण chatrapati shivaji maharaj jayanti bhashan 

शिव प्रेमाने ओतप्रोत भरलेला, शिवभक्तीचा सुगंध दरवळलेला, भगव्या रंगात रंगलेला, आजचा शिव सोहळा! आजच्या या सोहळ्याचे, कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर व शिवप्रेमी माझ्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा…

सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची, पाहत होते आतुरतेने वाट. सूर्याच्या सोनेरी किरणांनी मिटला अंधार, उजाडली शिवदिनाची पहाट. प्रत्येकाच्या हृदयी आज, निर्माण झाली शिव प्रेमाची लाट. शिवाजी महाराजांना वंदन करुनी, करतो मी माझ्या भाषणाला सुरूवात !

आई जिजाऊंचे पूत्र, गोर गरीब रयतेचे छत्र, शौर्य पराक्रमाचे महामेरू, सहसाची मुर्ती, कुशल शासक, महान योद्धे, जाणते राजे, परमप्रतापी, महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज महाराज, श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा……

मित्रांनो, आपण आज येथे सर्वजण प्रसन्न मनाने, हसतमुखाने बसलेलो आहोत, आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. पण शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले नसते तर, इतिहास वेगळा राहिला असता आणि वर्तमान भयावह राहिले असते.

ज्यांची जयंती आज आपण साजरा करीत आहोत, ते

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा अर्थ

छः-छत्र बनले रयतेचे,

त्रः-त्रस्त शत्रुला केले,

प:-पराक्रमी ते शूरवीर,

तीः- तिमिरास ज्यांनी चिरले,

शि:- शिस्तप्रिय ते भारी,

वाः- वाणीत मधुरता असलेले,

जी:- जिजाऊंचे ते पुत्र,

मः- मराठी मनामनात अधिराज्य ज्यांचे,

हा:-हार कधी न माननारे,

राः- राजे ते साऱ्या महाराष्ट्राचे,

जः- जनतेचे ते राजे,

छत्रपती शिवाजी राजे !

मित्रांनो, आपण आज येथे सर्वजण प्रसन्न मनाने, हसतमुखाने बसलेलो आहोत, आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. पण शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले नसते तर, इतिहास वेगळा राहिला असता आणि वर्तमान भयावह राहिले असते.

मला शिवाजी महाराजांचा एक विचार खूप आवडतो. आपणालाही आवडेल. त्यांचा अनमोल विचार असा :-“एक लहान पाऊल, लहान ध्येय प्राप्त करून देते. आणि तेच लहान पाऊल नंतर विशाल ध्येय देखील प्राप्त करून देते.”

खरंच किती मोलाचा आहे ना हा विचार !

आपणाला महाराजांच्या विचारानी आपल्या ध्येय मार्गावर चालायचे आहे. मार्गावर अपयश देखील येईल पण न घाबरता चालत राहायचे आहे. प्रयत्न करायचा आहे, कारण एक लहान पाऊल विशाल देखील प्राप्त करून देऊ शकते!

आज आपण मोठ्या उत्साहाने, आनंदाने शिवजयंती साजरा करतो. डीजे लावून नाचतो, सोशल मीडियावर शिवजयंतीच्या संदेशांचे तर पेवच फुटते. महाराजांना काय हेच अभिप्रेत होते?

आजचा तरुण थोडे अपयश आले तरी खचून जातो. व्यसनाधीन बनत चालला आहे, अशा तरुणांना काही समाजविघातक लोक हाताशी धरून वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून त्यांना वाममार्गाला लावत आहेत आणि आपले हित साधत आहेत. तरुणांनी वेळीच जागृत होणे गरजेचे आहे.

उंच आकाशी घे तू अशी काही भरीरी पहात राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी ! कमी ध्येय तूमनी ठाणू नको, थोड्या यशावर समाधान मानू नको. कारण अत्युच्च ध्येयासह बांधली यशाची दोरी ! उंच आकाशी घे तू अशी काही भरारी ! पहात राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी !

भाषणाचा शेवट मी एका कवितेतून करत आहे.

आई जिजाऊंच्या पोटी जन्मला एक तेजस्वी तारा, अवघ्या महाराष्ट्राचा प्यारा, असा होता माझा शिवाजी राजा.

प्रजेचे दुःख जाणणारा, परस्त्रीला आई मानणारा, नव्हती सीमा त्यांच्या पराक्रमाला, शौर्य आणि स्फुर्ती चा झरा, असा होता माझा शिवाजी राजा.

जुलूम आणि अत्याचाराने त्रस्त होती प्रजा, दावली प्रकाशाची वाट दूर केला अंधार सारा. असा होता माझा शिवाजी राजा!

रायरेश्वराच्या मंदिरात घेतली प्रतिज्ञा घेतले मावळ्यांना सोबतीला, गड जिंकला तोरणा स्वराज्याचा पाया रोवला. असा होता माझा शिवाजी राजा!

होता धिप्पाड असा अफजलखान चपळाईने त्याच्या पोटावर राजांनी केला वाघनखांनी मार बिचव्याने खानाचा कोथळा बाहेर काढला. असा होता माझा शिवाजी राजा!

स्वराज्याकडे केली वाकडी नजर बोटे त्याची छाटली, वाणीत ज्याच्या मधुरता डोळ्यांमध्ये होता अंगारा. असा होता माझा शिवाजी राजा!

शत्रूशी लढण्या रयतेच्या कल्याणा झिजवला आपला देह सारा, ज्यांच्या स्वप्न सरितेचा हिंदवी स्वराज्य किनारा. असा होता माझा शिवाजी राजा!

हातात धरून तलवार शत्रूस केले ठार, झेंडा फडकवला भगवा, सोनेरी पान जोडले इतिहासाला !

असे होते आपले छत्रपती शिवाजी राजे

महाराजांना मानाचा मुजरा एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो…..

जय जिजाऊ जय शिवराय

Related posts:

Leave a Comment