स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सोपे मराठी भाषण swami vivekananda jayanti
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो मी तुम्हाला स्वामी विवेकानंद जयंती निमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी विनंती करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते.
“उठा, जागे व्हा !
आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही, तोपर्यंत थांबू नका !!”
असा जगाला मूलमंत्र देणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे….
स्वामी विवेकानंद….
स्वामी विवेकानंद हे एक तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले महान तत्वज्ञानी व कुशल वक्ता होते. त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. विवेकानंदांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते.
लहानपणी खामी विवेकानंदांवर त्यांच्या आई-वडिलांनी उत्तम संस्कार केले. त्यांनी तत्वज्ञान, धर्म, इतिहास, विज्ञान, कला, साहित्य इ. विषयांचे सखोल ज्ञान मिळवले. त्याचबरोबर वेद, उपनिषद, पुराण, रामायण-महाभारत अशा ग्रंथाचा अभ्यास केला. तसेच ते खेळ व शारीरिक व्यायामात ही कुशल होते.
रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु होते. त्यानीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले. स्वामी विवेकानंदांनी जनतेच्या उध्दारासाटी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले. त्यांनी अनेक ठिकाणी अनाथाश्रम, वस्तीगृह, रुग्णालये स्थापण करून समाजसेवेचे अनमोल कार्य केले.
त्यांनी खूप भाषणे दिली व त्यातून हिंदू धर्माचा मानवतावादी चेहरा जगापुढे आणला. त्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला.
सन १८९८ मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाषणाची सुरुवात “माझ्या प्रिय बंधु-भगिनीं-नो” अशी केली तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. या भाषणात त्यांनी सर्व धर्म समान असून ते एकाच उद्दिष्टासाठी आहेत असे सांगितले. अशा या महापुरुषाने ४ जुलै १९०२ रोजी बेलूर मठ येथे समाधी घेतली. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजही त्यांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहेत.
स्वामी विवेकानंद यांची जयंती आज आपल्या शाळेमध्ये आपण साजरी करत आहोत त्यानिमित्त विनम्र अभिवादन.
संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली तुम्हीही शांततेने ऐकून घेतला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि माझे भाषण संपवते धन्यवाद.
जय हिंद जय महाराष्ट्र








