दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत independence day celebration 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत independence day celebration 

संदर्भ:-१. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/स्वदि-प्रदि/२०२५/१३३९७५०, दि.२३/०७/२०२५

२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/प्रदि-क.सं./२०२५/, दि.११/१२/२०२५ ३. शासन पत्र क्र. क्रमांक:- संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/एस.डी.४, दिनांक: २४ जुलै, २०२६

महोदय,

राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत शासन परिपत्रक दि. ३१ डिसेंबर, २०२४ अन्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मागील शैक्षणिक वर्षामध्ये दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तसेच दि. २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशभक्तीपर गीतांवर कवायत संचलन कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.

संदर्भाधीन शासन पत्र दि.२४ जुलै, २०२६ अन्यये आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने दि.१५ ऑगस्ट, २०२६ रोजी सर्व शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश प्राप्त आहेत.

शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनी शासकीय झेंडा चंदन कार्यक्रमानंतर साधारणतः २० मिनिटांचा सामुहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्यात यावा, यासाठी आवश्यक मार्गदर्शक व्हिडीओची लिंक सोबत उपलब्ध करुन देण्यात आली असून ती सर्व शाळांना पोहचविण्यात यावी. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण पद्धतीने करण्यात यावा.

शाळास्तरावर कवायत संचलन कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ बाबतची माहिती भरण्यासाठी सुविधा शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील स्कुल पोर्टलमध्ये मुख्याध्यापकांच्या लॉगिन वर उपलब्ध करून दिली जाईल.

कवायत संचलन कार्यक्रमाचा व्यावसायिक माहितीपट (Professional Documentary) तसेच त्याचा डिजिटल अहवाल संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी शासनास व या कार्यालयास सादर करावा. यासाठी आवश्यक ते सहकार्य शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी करावे.

तरी, याबाबत आपल्या स्तरावरुन आवश्यक अतिरिक्त सूचना शाळांना देऊन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, ही विनंती.

(सोबत : मार्गदर्शक व्हिडीओची लिंक)

https://youtu.be/jFYTbU8OwE?si=YVZF/vI4Vjv8yDZ_

Related posts:

Leave a Comment