क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दहा ओळींचे सोपे मराठी भाषण krantjoti savitribai fule jayanti
स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात,
पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती …
म्हणून तर आज जगती,
अमर आहे सावित्री….
१) आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन तसेच माझ्या बाल मित्रानो मी तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी विनंती करतो/करते
२)माझे नाव राज आहे.
३) आज ३ जानेवारी आहे. आपल्या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी करत आहोत. सर्वप्रथम जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा
४) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिणे वाचणे शिकवले
५) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण देऊन साक्षर बनवले.
६)सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या.
७) त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव येथे झाला.
८)सावित्रीबाई फुले व ज्योतिबांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली.
९)त्यांनी समाजातील गोरगरीब व उपेक्षितांच्या जीवनात नवचैतन्य फुलवले.
१०) त्या एक समाजपरिवर्तनाची शक्ती होत्या.
भाषण क्रमांक 2
1. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या.
2. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव, महाराष्ट्र येथे झाला.
3. त्यांनी आपल्या पती महात्मा जोतिराव फुले यांच्यासह स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केले.
4. १८४८ साली त्यांनी पुण्यात पहिले मुलींचे शाळा सुरू केले.
5. त्या शोषित पिढीत व महिला हक्कांसाठी काम करत.
6. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समानता आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
7. सावित्रीबाईंनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले
8. त्यांनी बालविवाह व जातीय भेदभावाविरोधात आवाज उठवला.
९. १८९७ साली प्लेग रुग्णांची सेवा करताना त्यांचे निधन झाले.
10. त्या भारतीय समाजसुधारक चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व होत्या.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
भाषण क्रमांक – 3
सोसुनी अनंत यातना,
शिकवलेस तू स्त्रीयांना…
धन्य होतो आम्ही,
थोरवी तुझी गाताना…..
1. सन्माननीय, व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो..
2. आज 3 जानेवारी, आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत.
3. क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या.
4. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला.
5. त्यांच विवाह वयाच्या अवाच्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला.
6. विवाहानंतर ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला – वाचायला शिकवून स्त्री शिक्षणाचा पाया रचना.
7. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली.
8. सावित्रीबाई फुले यांनी बालविवाह, केशवपन आणि सतीप्रथा यांना विरोध केला.
9. त्यांनी काव्यफुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर इ. लोकप्रिय काव्यसंग्रह लिहले.
10. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे 10 मार्च 1897 रोजी निधन झाले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय







