राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मराठी भाषण rajmata jijau jayanti bhashan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मराठी भाषण rajmata jijau jayanti bhashan 

वाघाची आई बनायला, काळीज वाघिणीचेच लागते…

म्हणून तर जिजामाता तूमच्या चरणापुढे…

मान माझी सदैव झुकते…

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्र-माचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या वर्ग मित्र आणि मैत्रीणींनो…

स्वराज्यजननी, राजमाता, माँसाहेब जिजाऊ यांच्या कार्याबद्‌दल माहिती नाही असा एकही माणूस सापड‌णार नाही. ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त स्वप्नच बघितले नाही तर ते सत्यात सुद्धा उतरविले.

आई ही जगातील सर्वांत महान यो‌द्धा आहे. आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, जिद्द, प्रेरणा, संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्य जननी जिजाबाई शहाजीराजे भोसले लहानपणापासूनच अन्यायाची चीड असणाऱ्या जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्हयातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. अनेक मुस्लिम सत्ता त्या काळात महाराष्ट्रात धुमाकुळ घालून जनतेला लुटत होत्या.

त्या राजवटी विरुद्ध शब्द काढायचीही हिम्मत कोणाला नव्हती, अशा बिकट परिस्थितात जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले.

आणि अखेर तो दिवस उजाडला, १९ फेब्रु-१६३० रोजी माँसाहेब जिजाऊँच्या पोटी बाळ शिवबा-चा जन्म झाला. बाळराजांना लहानपणापासूनच त्या रामायण आणि महाभारतातील शौर्याच्या कथा सांगत. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बाळकडू शिवरायांना माँसाहेबांकडूनच मिळाले होते. कुठल्याही मातेला पुत्रमोहापेक्षा काहीही प्रिय नसते. परंतू माँसाहेबांनी असा विचार कधीच केला नाही, रयतेसाठी सुखाचं स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊँचे योगदान फार मोठे आहे. फक्त मुस्लिम सत्तांपासून संरक्षण एवढेच नव्हे तर न्यायनिवाड्याची कामे, नेतृत्त्व कौशल्य आणि मुत्स‌द्दीपणा हे गुण सुध्दा त्यांनी शिवरायांच्या अंगी रुजविले.

स्वराज्याचे धाकले धनी, स्वराज्यरक्षक छ.संभाजी महाराज यांच्या जडणघडणीनेही माँसाहेब जिजाऊँचाच मोलाचा वाटा होता. समाजहिताचा विचार प्रथम करणाऱ्या माँसाहेबांची आज प्रत्येक घरी आहे. आपण म्हणतो, राजे पुन्हा जन्माला या.” परंतू त्यासाठी काळजावर दगड ठेवून शिवबा घडविणाऱ्या माँसाहेब आधी घडवाव्या लागतील.

शेवटी मी जाता जाता एवढेच म्हणेन की

“थोर तुमचे कार्य जिजाऊ, उपकार कधी नाही फिटणार …

चंद्र सूर्य असेपर्यंत, नाव तूमचे कधी नाही मिटणार…”

महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या स्वराज्यजननी माँसाहेब जिजाऊँना शतशः नमन करून मी माझे भाषण संपविते.

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन करते आणि जिजाऊ जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते धन्वाद जय हिंद जय महाराष्ट्र!

Related posts:

Leave a Comment