राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मराठी चारोळी pdf उपलब्ध rajmata jijau jayanti charoli 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मराठी चारोळी pdf उपलब्ध rajmata jijau jayanti charoli 

अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे !

नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे !!

अन्यायावर उगारलेले बाहु पाहिजे !

पुन्हा एकदा शिवराय आणि जिजाऊ पाहिजे !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

लाख येतील लाख जातील तुमची सर येणार नाही

जोवर न येणार जन्मास जिजाऊ पुन्हा शिवराय होणार नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

धगधगत्या ज्वालातून पेटल्या मशाली,

स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट झाली,

झेलून संकटे लाख झाल्या स्वराज्याची सावली,

धन्य ते शिवराय, धन्य जिजाऊ माऊली !!!!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

वीरकन्या, वीरपत्नी, जिजाऊ राजमाता !

त्यांच्या पोटी जन्मा आला, महाराष्ट्राचा भाग्यविधाता !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

स्वराज्याची प्रेरणा तुम्ही, महाराष्ट्राची शान !

मुजरा तुम्हाला मानाचा, झुकवून माझी मान !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुजरा माझा, माता जिजाऊंना !

ज्यांनी घडविले, शूर शिवबांना !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मराठी मातीत ज्यांनी केला गनिमी कावा,

तो एकच होता जिजाऊंचा छावा !

सांभाळले त्यांनी प्रेमाने सर्वांना,

स्वराज्य उभे राहिले त्यांच्या आशीर्वादाने !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मराठा साम्राज्य की शक्ति थी तू,

हर औरत के लिए प्रेरणा की ज्योति थी तू।

त्याग और सेवा की मिसाल है नाम तेरा,

तेरी वीरता के किस्से गाए ये जहाँ !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार !

चंद्र, सुर्य असेपर्यंत, नाव तुमचे न मिटणार !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

स्वराज्याचा ज्यांनी घडविला विद्याता !

धन्य त्या स्वराज्यंजननी, जिजाऊ माता !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्राचा साज तु रणरागिणीचे रूप तू !

अंधारल्या समाजासाठी तेजस्वी किरण तू !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

एक उजळली ठिगणी आणि लाख पेटल्या मशाली !

स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट झाली !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

स्वराज्याची प्रेरणा तुम्ही, महाराष्ट्राची शान !

मुजरा तुम्हाला मानाचा, झुकवून माझी मान !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

वीरकन्या, वीरपत्नी जिजाऊ राजमाता !

त्यांच्या पोटी जन्मा आला, महाराष्ट्राचा भाग्यविधाता !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मराठी मातीत ज्यांनी केला गनिमी कावा,

तो एकच होता जिजाऊंचा छावा ।

सांभाळले त्यांनी प्रेमाने सर्वाना,

स्वराज्य उभे राहिले त्यांच्या आशीर्वादाने !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुजरा माझा माता जिजाऊंना,

घडविले त्यांनी शुर शिवबांना..

साक्षात होत्या त्या आई भवानी,

जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी !!!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

स्वराज्याची सावली, ज्यांनी शिवबाला दिशा दावली !

स्वराज्याची गुढी उभारली, धन्य ती जिजाऊ माऊली !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

स्वराज्याची प्रेरणा तू महाराष्ट्राची शान !

मुजरा तुला मानाचा झुकवून आमुची मान !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

गाजविला प्रताप असा झुकविली जुलुमशाही ।

धन्य धन्य तू जिजाऊ त्या शिवबाची आई !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान

पुत्र घडविला ऐसा जो राष्ट्राची शान

देश प्रीतीचे धडे गिरविले तिजपाशी बसूनी

धन्य जिजाऊ धन्य जिजाऊ नमन तिला करुनी !!!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पेच प्रसंग आला तरी तुम्ही डगमगल्या नाही ।

संकटांचा सामना केला, नुसती चिंता केली नाही !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इतिहासा, तू वळूनी पहा, पाठीमागे जरा |

झुकवून मस्तक करशिल जिजाऊंना मानाचा मुजरा !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्राच्या मातीत ज्याने केला गनिमी कावा |

तो एकच होता माझ्या जिजाऊंचा छावा !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सहयाद्रीचा छावा तू दिला आम्हाला आई ।

जाधवांची लेक तू धन्य धन्य तू जिजाई !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माउलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला, त्या राष्ट्रमाता, वीरमाता माँ साहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, पराक्रम, व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हे आई राजमाता । तुच आमुची गाथा ।

तूच आमुची राष्ट्रमाता | तूच आमुची विश्वमाता ।

झुकतसे माथा | तुझीये चरणी !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जिजाऊ तुमच्या स्वप्नांना तुम्ही हिमतीचे बळ दिले |

तुमच्या आशिर्वादानेच शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जिजाऊ तुमच्यामुळे आम्हाला जाणता राजा मिळाला |

स्वराज्याचा खरा अर्थ त्यांच्यामुळे कळाला !!

Related posts:

Leave a Comment