दि.२५.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत shasan paripatrak
संदर्भ :
१. शासन निर्णय क्रमांक प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४, दि.२५/०८/२०२५
२.जा.क्र.प्राशिसं/खाप्राशा/मुल्यांकन/२०२५/३५०४/०३७४५, दि.२९/०८/२०२५
३. शासनपत्र क्रमांकः प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/ एसएम-४, दि.१३/१०/२०२५
४. शासनपत्र क्रमांकःप्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४, दि.५/१२/२०२५
शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदान व नव्याने २० टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा, वर्ग/तुकडयासंदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कार्यवाही करणंबावत आपणास वरील संदर्भ क्र.२ अन्वये निर्देश देण्यात आलेले आहेत.
सदर शासन निर्णयातील अटी व शतीमधील अट क्र.१७ मध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे. अट क्र.१७ : दरवर्षी संबंधित शिक्षण संचालक स्तरावरून ५ टक्के शाळांची ईश्वर चिड्डी पध्दतीने निवड करून पडताळणीचा स्वयस्पष्ट अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक राहील.
वरीलप्रमाणे नमूद केल्यानुसार शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ मधील अ, ब, क व ड मधील नमूद माध्यमिक शाळा व माध्यमिक शाळांमधील वर्ग/तुकडयांना आपले स्तरावरून पात्र ठरवून अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे अशा सर्व माध्यमिक शाळा व माध्यमिक शाळांमधील वर्ग/तुकडयांची तपासणी करणेबाबत खालीलप्रमाणे जिल्हानिहाय तपासणी पथक तयार करण्यात आलेले आहे.
१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प./ शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (उ/द/प)
२. उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प./ शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (उ/द/प)
३. अधीक्षक, सारासे, गट ब, जि.प./ बृहन्मुंबई (उ/द/प)
सदर तपासणी पथकातील सदस्यांनी त्यांना तपासणी करावयास दिलेल्या जिल्हयातील २० टक्के, ४० टक्के, ६० टक्के व ८० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या सर्व माध्यमिक शाळा व वर्ग/तुकडयांची शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ मधील अटी व शर्तीनुसार सोचतच्या विहित प्रपत्रात नमूद सर्व बाबीची दिनांक ५/०१/२०२६ ते दिनांक ३१/०१/२०२६ या कालावधीत तपासणी करून त्यासंदर्भातील आपला स्वयस्पष्ट अहवाल दिनांक २/०२/२०२६ रोजी समक्ष संचालनालयास सादर करावा.










