राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुद्देसूद मराठी भाषण rajarshi shahu maharaj marathi bhashan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुद्देसूद मराठी भाषण rajarshi shahu maharaj marathi bhashan 

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम ! आज या दिनाचे औचित्य साधून लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनात घडलेली एक गोष्ट मी आपणा समोर सादर करणार आहे.

महायुद्धाच्या दरम्यान कुट-एल आमारा इथं हिंदी फौजा तुर्की वेढ्यात अडकल्या होत्या. सैन्याची संपुर्ण रसद संपली होती. आता घोडे मारून खाण्याची वेळ आली. पण हिंदी शिपायांनी घोडे खाण्यास नकार दिला. ते म्हणाले आम्ही घोडे खाल्ले तर पुन्हा हिंदूस्थानात गेल्यानंतर लोक वाळीत टाकतील. तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी शाहू महाराजांना लेखी खलिता पाठवून

संपुर्ण प्रकार कळवला.

शाहू महाराजांनी हिंदी फौजांना निरोप पाठवला, “तुम्ही खुशाल घोड्याचं मांस खा. तुमच्या जातीपातीच्या, लग्नकार्यांची जबाबदारी मी घेतो. प्रसंगी तुमच्या परिवारातल्या आणि माझ्या संबधितामधल्या कुटुंबीयांमध्ये सोयरिकीची हमी मी घेतो.”

हा खलिता लष्करी अधिकाऱ्यांनी हिंदी फौजांना वाचून दाखवला तेव्हा भुकेनं व्याकुळ झालेल्या फौजेनं एकच जयघोष केला. छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. शाहू महाराजांचा धर्माहून मोठा असणारा पगडा पाहून ब्रिटिश अधिकारी आश्यर्यचकित झाले.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Related posts:

Leave a Comment