26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण speech on republic day 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण speech on republic day 

आपला राष्ट्रीय सण ‘प्रजासत्ताक दिन’ होय

‘दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या आनंदाचा,

देशाच्या गौरवाचा… अभिमानाचा आणि उत्साहाचा,

दिवस हा आपुल्या विजयाचा, विजय असो प्रजासत्ताकदिनाचा !”

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो… आज २६ जानेवारी म्हणजेच आपला ‘प्रजासत्ताक दिन’. आपल्या सर्वांच्या या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी आपणास काही दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकून घ्यावेत अशी मी विनंती करत आहे.

सन १९५० पासून दरवर्षी या दिवशी आपण सारे हा दिवस संपूर्ण देशभर ‘प्रजासत्ताक दिन’ हा ‘गणराज्य दिन’ म्हणून साजरा करतो. भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. म्हणजेच ‘लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांच्याकडून चालवलेले राज्य आहे.’ आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र मिळाले आणि आपण ब्रिटीश राजवटीच्या गुलामी जोखंडातून मुक्तता मिळाली. स्वातंत्र, समता व न्याय देणारी; शिवाय माणसाला माणुसकीने जगण्यास हक्क देणारी राजवट सुरु झाली. या सर्वांचा पाया होता ‘भारताची राज्यघटना’.

भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर देशाला नविन आकार, नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे हे देशासमोर मोठे आव्हान होते. शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली आणि त्यांनी ती लिलया पेलली.

भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानाने नागरिकांना मुलभुत हक्क आणि अधिकार प्राप्त झाले. प्रत्येकाला शिक्षणाचा, मतदान करण्याचा, भाषण-अभिव्यक्ती करण्याचा इ. अधिकार मिळाले.

२६ जानेवारी हा भारताचा एक राष्ट्रीय सण सण आहे. आहे हा दिवस आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूर वीरांची आणि देशभक्तांची आठवण करून देतो. आजही देशाच्या सीमेवर सैनिक अहो-रात्र देशाचे रक्षण करीत आहेत. याचे भान ठेवण्याचे सांगतो. हा दिवस शांतता व ऐक्याची शिकवण देतो.

प्रजासत्ताक दिन हा भारताच्या भूतकाळाचा अभिमान, वर्तमानातील जबाबदारी आणि भविष्याची उज्ज्वलू आशा यांचे भान ठेवण्याचे सांगतो. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. मला माझा भारत देश खूप खूप आवडतो

जय हिंद, जय भारत

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 1

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 2

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 3

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 4

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 5

प्रजासत्ताक दिन इंग्रजी भाषण क्रमांक- 6

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 7

प्रजासत्ताक दिन इंग्रजी भाषण क्रमांक- 8

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 9

प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 10

Related posts:

1 thought on “26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण speech on republic day ”

Leave a Comment