स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रेरणादायी  प्रसंग swami vivekananda motivational 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रेरणादायी  प्रसंग swami vivekananda motivational 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील महत्त्वाचे तीन प्रसंग खाली दिले आहेत त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगातून आपणाला खूप काही शिकायला मिळते जीवनात खूप पुढे जायचे असेल तर स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग वाचा. स्वामी विवेकानंद यांचे विचार वाचून आचरणात आणा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडेल. जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.

11 सप्टेंबर 1893 मधील अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणामुळे स्वामी विवेकानंद यांना संपूर्ण जगभरात प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेतील वृत्तपत्राने स्वामीजींचे वर्णन भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी अस केलं होतं. स्वामीजी असे घडले ते त्यांच्या आईवडिलांच्या संस्कारामुळे त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनुभवामुळे… अशाच त्यांच्या जीवनातील हे तीन प्रेरणादायी प्रसंग यातून आपल्याला प्रेरणा मिळेल.

पहिला प्रसंग 

नदी पार करण्यासाठी स्वामी विवेकानंद नदीच्या काठावर उभे होते. तेवढ्यातच तिथे एक साधू आले. आणि स्वामींना पाहून विचारले, “तुम्ही स्वामी विवेकानंद आहात का? “तेव्हा स्वामीजींनी उत्तर दिले, “हो मीच आहे स्वामी विवेकानंद”. यावर साधूने परत प्रश्न केला की, “नक्की तुम्हीच स्वामी विवेकानंद आहात का? “यावर स्वामीजी म्हणाले, “हो मीच स्वामी विवेकानंद आहे.” यावर साधूने पुन्हा प्रश्न केला की, “मग तुम्ही इथे काय करत आहात?” तेव्हा स्वामीजी उत्तर दिले की, “मी इथे नदीच्या पलीकडे जाण्यासाठी जहाजाची वाट बघतो आहे. साधूने पुन्हा शंकेने विचारले, “खरंच तुम्हीच स्वामी विवेकानंद आहात का? स्वामीजी पुन्हा म्हणाले, “हो मीच आहे स्वामी विवेकानंद.” त्यावर साधू म्हणाला, “तुमचे जगात एवढे नाव आहे, एवढे लोक तुम्हाला ओळखतात, तुमचा आदर करतात आणि तुम्ही ही एक छोटीशी नदी पार करू शकत नाहीत.आणि एवढं बोलून त्या साधूने पाण्यावर चालत नदी पार केले व परत स्वामीजीकडे आले. पहा माझ्याकडे एवढे ज्ञान आहे तरी मला कुणीच ओळखत नाहीत. मी एवढा ज्ञानी असूनही माझं कोणीच नाव घेत नाहीत. आणि तुमच्या जवळ तरी असे कोणते ज्ञान नाही तरी लोक तुम्हाला मानतात. यावर स्वामीजीनी हसत त्यांना विचारले की, “ही विद्या शिकायला तुम्हाला किती काळ लागला? ” त्यावर साधू म्हणाला, “पंधरा वर्षे लागली.” यावर स्वामीजी म्हणाले, “साधुमहाराज तुम्ही माझ्याबरोबर चला. तेवढ्यातच नौका आली. दोघेही नौकेत बसले अन् नदी पार केले. आणि नौकेतून उतरल्यावर स्वामीजींनी नौका वाल्याला दोघांचे 50-50 पैसे मिळून एक रुपया त्याचे भाडे म्हणून दिले. आणि स्वामीजी साधुमहाराजाला म्हणाले, “साधुमहाराज जे काम 50 पैशात होऊ शकतं. त्या कामासाठी तुम्ही आपल्या जीवनातील 15 वर्षे वाया घालवली. याच वेळेचा वापर तुम्ही समाजाच्या कल्याणासाठी केले असते, तर संपूर्ण जगाने तुम्हालाही ओळखले असते. यामुळे तुमचेही नाव झाले असते. आणि मी तेच केलं त्यामुळे लोक मला स्वामीजी म्हणतात.”

प्रसंग दुसरा 

एकदा स्वामीजी अरुंद रस्त्यावरून चालत जात असताना त्यांच्या मागे काही माकडे लागली होती. ते पाहून स्वामीजी पळू लागले. तरीही माकडे त्यांच्या मागे पळतच येत होती. तेव्हा कुठून तरी आवाज आला. पळू नकोस, सामोरे जा. तेव्हा स्वामीजी थांबले व मागे वळून माकडांच्या दिशेने चालू लागले. तर काय आश्चर्य सर्व माकडे परत फिरली. अन् पळून गेली. या अनुभवातून स्वामीजींना मोठी शिकवण मिळाली की संकटांना घाबरून पळून जाण्यापेक्षा त्यांना धैर्याने सामोरे गेले पाहिजे. तरच संकटे नाहीसे होतात.

तिसरा प्रसंग 

एके दिवशी स्वामीजींच्या आश्रमात स्वामीजींना भेटायला एक व्यक्ती आपला मोठा प्रश्न घेऊन आला. आणि स्वामीजींना आपली अडचण सांगू लागला म्हणाला, की” मी सुशिक्षित असून खूप मेहनत करतो. एवढी मेहनत करूनही मला कोणत्याच कामात यश मिळत नाही. तुम्हीच सांगा स्वामीजी मी काय करू? त्या व्यक्तीची समस्या स्वामीजींच्या लक्षात आली. आणि स्वामीजी त्या व्यक्तीला आपला पाळीव कुत्रा देत म्हणाले, “या कुत्र्याला थोडावेळ बाहेर फिरून आण. तोपर्यंत मी तुझ्या समस्येचे उत्तर शोधतो. अर्ध्या एका तासाने ती व्यक्ती कुत्र्याला घेऊन वापस आश्रमात आला. स्वामीजींनी पाहिले की कुत्रा जोरजोरात हापत आहे व तो व्यक्ती बिलकुल नॉर्मल होता. तेव्हा स्वामीजींनी त्या व्यक्तीला विचारलं हा कुत्रा एवढं का हापत आहे? त्यावर ती व्यक्ती म्हणाली की, “मी सरळ जात होतो. परंतु कुत्रा मात्र जिथे जागा मिळेल तिथे जात होता. रस्त्यावरील इतर कुत्र्यांसोबत भांडण करत होता. म्हणून हा इतका हापत आहे. तेव्हा स्वामीजी हसत म्हणाले, “हेच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. तू तुझ्या ध्येय सोडून लोकांच्या मागे धावतो. लोक जे करतात तेच तू करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच तू तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही.

 

Related posts:

Leave a Comment