शैक्षणिक ॲप “दीक्षा अँपप्लीकेशन” माहिती व लिंक उपलब्ध educational application information link 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक ॲप “दीक्षा अँपप्लीकेशन” माहिती व लिंक उपलब्ध educational application information link 

(Digital Infrastructure for Knowledge Sharing)

‘दीक्षा’ अॅप हे भारतातील डिजिटल शिक्षणाचे एक प्रमुख प्लॅटफॉर्म आहे. याचे पूर्ण नाव ‘डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग’ आहे. हे प्लॅटफॉर्म विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षणक्षेत्रातील इतर घटकांना एकाच ठिकाणी शैक्षणिक साहित्य, व्हिडिओ, पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक साधने उपलब्ध करून देते.

१) दीक्षा (DIKSHA) अॅपचे मुख्य फायदे :

मोफत आणि सहज उपलब्ध हे अॅप मोफत डाउनलोड करून वापरता येते.

विविध भाषांमध्ये सामग्री दीक्षा अॅपवर ३६ पेक्षा जास्त भाषांमध्ये शैक्षणिक सामग्री उपलब्ध आहे.

गरजेनुसार शिकणे : विदयार्थी आपल्या गरजेनुसार शिकण्याची सामग्री शोधू शकतात.

शिक्षकांसाठी उपयुक्त शिक्षक आपल्या वर्गात पाठ्य घटकांसाठी नवीन शैक्षणिक साधने शोधू शकतात.

विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी संवाद साधण्याचे माध्यम या अॅपद्वारे विदयार्थी आणि शिक्षक एकमेकांशी सहज संवाद साधू शकतात.

२) दीक्षा (DIKSHA) अॅपची काही प्रमुख वैशिष्ट्ये :

पाठ्यपुस्तके : विविध विषयांची पाठ्यपुस्तके E-Book स्वरूपात उपलब्ध आहेत.

व्हिडिओ : विषय/पाठ्यांश समजावून सांगणारे विविध व्हिडिओ उपलब्ध आहेत.

प्रश्नमंजुषा (क्विझ) आणि प्रश्नोत्तरे विषयाचे आकलन जाणून घेण्यासाठी विविध क्विझ आणि प्रश्नोत्तरे उपलब्ध आहेत.

मंच (फोरम) : विदयार्थी आणि शिक्षक एकमेकांना प्रश्न विचारू शकतात आणि उत्तरेही देऊ शकतात.

QR (Quick Response) कोड: शाळा आणि वर्गखोल्यांमध्ये QR कोड स्कॅन करून संबंधित शैक्षणिक सामग्री पाहता येते.

३) दीक्षा (DIKSHA) अॅप कसे वापरावे?

अॅप डाउनलोड करा आणि आपले अकाउन्ट तयार करा.

आपला वर्ग आणि संबंधित विषयाची निवड करा.

आपल्याला आवश्यक असलेली शैक्षणिक सामग्री शोधा.

व्हिडिओ पाहा, प्रश्नमंजुषा (क्विझ) सोडवा आणि मंचामध्ये (फोरम) सहभागी व्हा.

४) दीक्षा (DIKSHA) अॅप कुणासाठी उपयुक्त आहे?

विदद्यार्थी : सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षा अॅप’ उपयुक्त ठरू शकते.

शिक्षक : शिक्षक नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतीसाठी ‘दीक्षा अॅप’चा वापर करू शकतात.

शिक्षणसंस्था : शाळा आणि महाविदयालये आपल्या विद्यार्थ्यांना प्रभावी शिक्षण देण्यासाठी ‘दीक्षा अॅप’चा वापर करू शकतात.

प्ले स्टोअरवरून ‘दीक्षा अॅप’ डाउनलोड करण्यासाठी लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app

Diksha App

दीक्षा अॅप ओपन करा

लॉग इन/साइन अप करा

कक्षा निवडा

विषय निवडा

सामग्री शोधा

सामग्री पाहा

अभ्यास करा

DIKSHA

प्रगती तपासा

Related posts:

1 thought on “शैक्षणिक ॲप “दीक्षा अँपप्लीकेशन” माहिती व लिंक उपलब्ध educational application information link ”

Leave a Comment