आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीच्या लाभाबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना ekstar padonnatti vetanshreni 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीच्या लाभाबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना ekstar padonnatti vetanshreni 

वाचा :- सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांकः टिआरएफ-२०००/प्र.क्र.३/१२, दि.०६.०८.२००२

शासन निर्णय येथे पहा pdf download

प्रस्तावना :- आदिवासी भागात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय झाल्यानंतर, त्यांना दिलेले एकस्तर पदोन्नतीचे लाभ काढून घेण्यात आल्याच्या विरोधात मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्र. ८८२०/२०२१ दाखल केली होती. सदर रिट याचिकेच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाने दि.२१.१२.२०२१ रोजी न्यायनिर्णय दिला असून त्याद्वारे सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि.०६.०८.२००२ मधील ३(७) येथील तरतुदीचा योग्य अन्वयार्थ स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

तद्नंतर एकस्तर पदोन्नतीचे लाभ काढून न घेण्यासाठी मा. उच्च न्यायालयात विविध रिट याचिका (रिट याचिका क्र. ८८२१/२०२१, ८८२२/२०२१, ८८२३/२०२१, ८८२४/२०२१, ८८२५/२०२१ तसेच रिट याचिका क्र. ३१५८/२०२१, ३२८४/२०२१, ४११५/२०२१ आणि ४२१३/२०२१) दाखल झाल्यानंतर या सर्व याचिकांच्या प्रकरणी देखील मा. उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. ८८२०/२०२१ च्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच कार्यवाही करण्याबाबत निर्देशित केले आहे.

मा. उच्च न्यायालयाच्या उपरोक्त निर्देशांनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०६.०८.२००२ च्या शासन निर्णयामधील ३(७) येथील तरतुदीचा योग्य अन्वयार्थ स्पष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक :- राज्यातील दुर्गम व मागासलेल्या आदिवासी भागांचा तसेच नक्षलग्रस्त संवेदनशील भागांचा जलद गतीने विकास होण्याच्या दृष्टीने या बिकट क्षेत्रात शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तेथे कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनात्मक सवलती देय करण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णय दि.०६.०८.२००२ अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णयाद्वारे एकस्तर पदोन्नती देण्याबाबतची नवीन सवलतीबाबतची तरतूद ३(७) खालीलप्रमाणे आहे :-

“सर्व पदांसाठी एकस्तर पदोन्नती :-

शासन निर्णय येथे पहा pdf download

आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून गट अ ते गट ड मधील सर्व पदधारकांना संबंधित कर्मचारी / अधिकारी त्या क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच्या काळात त्यांनी धारण केलेल्या मूळ पदाच्या नजीकची वरिष्ठ / पदोन्नतीची वेतनश्रेणी व त्या अनुषंगाने वेतननिश्चितीचा लाभ देण्यात यावा. ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. त्यांना आणखी वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभअनुज्ञेय नसेल. ही एकस्तर पदोन्नतीची योजना दि.०१.०२.२००२ पासून अंमलात येईल आणि ती संबंधित कर्मचारी / अधिकारी आदिवासी/ नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच अनुज्ञेय राहील. त्या क्षेत्रातून कर्मचारी / अधिकारी बिगर आदिवासी क्षेत्रात परत आल्यावर तो त्याच्या मूळ संवर्गातील वेतनश्रेणीत पूर्वीच्या वेतनाच्या अनुषंगाने वेतन घेईल.”

शासन निर्णय येथे पहा pdf download

Related posts:

Leave a Comment