उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेब्रु-मार्च २०२६ परीक्षांच्या तारखांबाबत ssc and hsc board exam timetable
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना आयोजित करण्यात येणार आहेत.
शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या तारखा वरीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत.
उपरोक्त परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.










