इ.११ वी तुकडीमान्यता व शाखा मान्यतेच्या प्रस्तांवाबाबत eleventh tukdi manyata prastav circular
संदर्भ
:- १) शासन परिपत्रक क्रमांक-MSC-२१/१/२०२६-MSC-(SM-५) दि. ३०/०९/२०२६.
२) शासन पत्र क्रमांक १०४६३२१५/२०२६/एसएम-५ दि. २२/०६/२०२६
उपरोक्त विषयी संदर्भीय पत्रे कृपया पहावित. मा. आयुक्त (शिक्षण) यांना उद्देशून लिहिलेले संदर्भीय पत्र क्र. १ अन्वये शाळांना स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर नव्याने तुकडी मान्यता देणे / शाखांना मान्यता देणेबाबतचे अधिकार मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्याकडे होते परंतु, शासन परिपत्रक दि. ०३.०९.२०२६ रोजी च्या आदेशान्वये सदर अधिकार हे आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रत्यायोजित करण्यात आले आहेत.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांतील इ. ११ वी प्रवेश प्रक्रीया संपुष्टात आली आहे. सन २०२७/२८ या शैक्षणिक या वर्षाकरिता इ. ११ वी जादा तुकडी/अतिरिक्त शाखेचे सर्व प्रस्ताव ON LINE पोर्टल मार्फत सादर करण्यात यावे. संदर्भीय क्र. १ व २ अन्वये शासनस्तरावरुन परत करण्यात आलेले व यापुढील ON LINE पोर्टलद्वारे सादर करण्यात यावेत. तसेच ऑफलाईन शासनस्तरावरुन प्राप्त झालेले प्रस्ताव परत नेण्याकरिता जबाबदार कर्मचा-यांना संचालनालयात उपस्थित राहणेबाबत आपलेस्तरावरुन निर्देश देण्यात यावेत.
ON LINE पोर्टलचे कामकाज अंतिम टप्प्यात असून सदर पोर्टल कार्यान्वियीत झाल्यानंतर स्वतंत्रपणे सूचना देण्यात येतील. यापुढे ऑफलाईन प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. सोबत : संदर्भीय पत्रे.
(टिपणी मा. आयुक्त (शिक्षण) यांनी मान्य केली असे.)











