मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र (FLN) अंतर्गत पुरविण्यात येत असलेल्या साहित्यांमधील कार्यपुस्तिकांचे वाटप करणेबाबत fln karyapustika sahitya
महोदय,
समग्र शिक्षा अभियानांतर्गत मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र (FLN) अंतर्गत पुरविण्यात येत असलेल्या साहित्यांमध्ये कार्यपुस्तिकांचा समावेश आहे. कार्यपुस्तिका या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाल्यानंतर सरावाकरिता आहेत. अद्याप व्दितीय सत्राची परीक्षा सुरू झाली नसल्याने व्दितीय सत्राच्या कार्यपुस्तिकांचा वापर करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. तसेच, प्रथम सत्राच्या कार्यपुस्तिका या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षात होणाऱ्या प्रवेशानुसार देण्यात याव्यात, अशा स्वरूपाच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात, जेणेकरून विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीपासून कार्यपुस्तिकांचा वापर करू शकतील.
२. इयत्ता १ लीच्या प्रथम सत्राच्या शिल्लक राहिलेल्या कार्यपुस्तिका इयत्ता १ लीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देण्यात याव्यात, यासंदर्भात देखील सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.









