गुरुपौर्णिमा निमित्त छोटी मराठी भाषणे gurupornima marathi bhashan
गुरुपौर्णिमा निमित्त भाषण क्रमांक- 1
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे तसेच माझे वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणीनों….सर्वांना माझा नमस्कार..!!
महान ऋषी महर्षी वेद व्यास यांच्या जन्माच्या स्मरणार्थ या उत्सवाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात हिंदू साहित्यातील सर्वात महत्वाचे महाकाव्यांपैकी एक असलेल्या महाभारताची रचना करण्याचे आणि हिंदू धर्मातील सर्वात जुने पवित्र ग्रंथ असलेल्या वेदांचे संकलन करण्याचे श्रेय वेद व्यासांना जाते. भारतीय संस्कृती आणि अध्यात्मात त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानामुळे
“गुरु आहे सावली, गुरु आहे आधार
गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार,
गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,
शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!”
गुरु पौर्णिमेच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनाना माझा प्रणाम.
मानवी जीवनातील गुरूच्या महत्वाला साधू संत आणि ऋषी मुनींनी अनेकदा सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत
गुरू हाच परीस आहे, ज्याचा स्पर्श होताच आपल्या आयुष्याचं सोनं होतं गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु पौर्णिमेच्या आजच्या या विशेष दिवशी विश्वातील
समस्त गुरुजनाना माझा प्रणाम…!!
______________________________________
गुरु पौर्णिमेनिमित्त भाषण क्रमांक-2
सर्व प्रथम रयतेचा राजा शिवछत्रपती यांना वंदन करून…!!
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे व माझे वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणीनों…!!
कुंभार ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके बनवतो. त्याचप्रमाणे गुरु सजीव मानव रुपी व्यक्तिमत्त्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात. गुरूचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे. आपण त्याच्यापुढे नम्र होऊन ज्ञान कण वेचले पाहिजे. कारण शेवटी गुरुविण कोण दाखविल वाट..?
भविष्यातील एक चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूच प्रभाव टाकतात. आणि म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये गुरूंची महती काहीतरी आशा पद्धतीने गायली गेली आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः.
जिवनाच्या प्रतेक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही जेव्हा काय करावे काहिही समजत नाही तेव्हा आठवता तुम्ही तुमच्या सारख्या गुरुना मिळुन खरोखर धन्य आहोत आम्ही
मित्रांनो, जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु. दरवर्षी गुरूंच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरु पौर्णिमेनिमित्त माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा
______________________________________
गुरु पौर्णिमेनिमित्त भाषण क्रमांक-3
गुरुब्रम्हा गुरु विष्णू : गुरुदेवो महेश्वरायः । गुरु साक्षात परब्रम्ह, तस्मैयश्री गुरवे नमः ।।
आज आपल्या शाळेमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माजी गुरुजन वर्ग सर्वांना माझा नमस्कार
गुरु म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे रुपः या साक्षात परब्रम्हाला माझा नमस्कार असोः असा गुरुमहिमा भारतीय संस्कृतीत वर्णन केला आहे. ही गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमेदिवशी साजरी होते. व्यास महर्षिनी महाभारत हा महान ग्रंथ लिहिला. महाभारत काळातील मोठे विद्वान, श्रेष्ठ असे व्यासमुनी होऊन गेले. त्याच्याइतके थोर व्यासंगी, ज्ञानसंपन्न गुरु अद्यापपर्यंत झाले नाहीत अशी आपली श्रद्धा आहे.
गुरुपौर्णिमेचा गहन आध्यात्मिक अर्थ आहे. पारंपारिक गुरू-शिष्य परंपरेत गुरूला देवी ज्ञानाचा वाहक मानले जाते. गुरू आणि शिष्य यांच्यातील नाते पवित्र आहे, गुरू है शिष्याला अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारे मार्गदर्शक म्हणून आदरणीय आहेत.
गुरु बिना ज्ञान नहीं ज्ञान
बिना आत्मा नहीं ध्यान, ज्ञान,
धैर्य और कर्म सब गुरु की ही देन है।
प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान हे खूप मोठे असते जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये योग्य तो मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे आणि एक चांगले जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु…!!
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…
______________________________________
गुरुपौर्णिमेनिमित्त भाषण क्रमांक -4
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे व माझे गुरूजन वर्ग व येथे उपस्थित शिक्षक एका कुंभार प्रमाणे आपल्या हातांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाला मजबुती प्रदान करतात. येणाऱ्या भविष्यासाठी ते विद्यार्थ्याला तयार करतात. शिक्षकांच्या मेहनतीमुळेच कोणी डॉक्टर, इंजिनियर, पायलट, वकील, सैनिक इत्यादी बनतात. शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला योग्य व वाईट गोष्टींमधील फरक सांगतात. शिक्षक शिष्टाचार, धैर्य, सहनशीलता इत्यादी गुणांनी जीवन जगायला शिकवतात.
मनुष्याजवळ ज्ञान उपजत असले तरी ते फलद्रुप होण्यासाठी त्याला सद्गुरु पासून चालना मिळावी लागते.
विद्या हे एक महान दैवत आहे. विद्यादान करण्याचे महान व पवित्र असे कार्य गुरु करतात. म्हणूनच गुरु म्हणजे ज्ञानाची गंगोत्री सरस्वतीची अमृतवाणी, सर्वाना ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभ, भावी पिढीचा शिल्पकार, गुरु म्हणजे दयेचा सागर, केवळ लोकांच्या कल्याणासाठीच झटणारा, निस्वार्थी ज्ञान दान करणारा, गुरुविना कोणाच्याही जीवनाचा मार्ग सफल होऊ शकत नाही. कारण दिपस्तंभाशिवाय आपली नौका किनाऱ्याला सुरक्षितपणे पोहोचवू शकत नाही.
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा… एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो धन्यवाद
______________________________________
गुरुपौर्णिमेनिमित्त भाषण क्रमांक-5
दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी आपल्या शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करत आहोत या गुरुपौर्णिमेनिमित्त येथे जमलेल्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुवर्य आणि माझ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो…
गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते. कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या पौर्णिमेलाच झाला होता.
हिंदू साहित्यातील सर्वात महत्वाचे महाकाव्यांपैकी एक असलेल्या महाभारताची रचना करण्याचे आणि हिंदू धर्मातील सर्वात जुने पवित्र ग्रंथ असलेल्या वेदांचे संकलन करण्याचे श्रेय वेद व्यासांना जाते. भारतीय संस्कृती आणि अध्यात्मात त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानामुळे गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे.
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…
______________________________________
गुरुपौर्णिमा भाषण क्रमांक-6
व्यासपीठावरील सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे आदरणीय माझे सर्व शिक्षक, माझे प्रिय सर्व वर्गमित्र, या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना माझा नमस्कार…!!
शिक्षक एका सुंदर आरशाप्रमाणे असतात. ज्यामध्ये व्यक्ती आपल्या व्यक्तित्वाची ओळख करून घेतो. शिक्षण ही अशी मजबूत शक्ती आहे जिच्या मदतीने आपण समाजाला सकारात्मकतेकडे वळवू शकतो. आणि हे शिक्षण प्रदान करण्यामुळे शिक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुरुसमान कुणी नाही सोयरा। गुरुविण नाही थारा ।।
गुरु निधान गुरु मोक्ष। गुरु हाच आपुला आसरा ।। गुरु प्रमाणे शिष्य घडत असतो. म्हणून आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करायला हवे. त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा. चांगला अभ्यास करून गुरूचा, देशाचा, शाळेचा व आई-वडिलांच्या नावलौकिक करायला हवा. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा… धन्यवाद…!!
______________________________________
गुरुपौर्णिमा भाषण क्रमांक-7
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या उक्तीप्रमाणे गुरुचे महत्त्व आघात आहे गुरुमुळेच आपल्याला ज्ञान मिळते गुरुमुळेच आपल्याला संस्कार करतात आणि गुरूमुळे जीवन सुंदर जीवन जगता येते म्हणून माझ्या जीवनातील सर्व गुरूंना माझा प्रणाम
आज आपल्या शाळेमध्ये गुरुपौर्णिमा आपण साजरी करत आहोत त्यानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे व माझे गुरुजन वर्ग तसेच येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी नम्र विनंती करतो
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला.
जे लोक आपल्याला जगण्यासाठी नेहमी चांगले संस्कार देतात, ते आपले गुरूच आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरूच कारणीभूत ठरतो. आताचा काळ बदललेला आहे. शिक्षण पद्धती बदललेली आहे. गुरु आणि शिष्य यांचे नाते मात्र बदललेले नाही. ते आजही पवित्र मानले जाते. आजपर्यंत जगात ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्यावर त्यांच्या गुरूंचाच अमित प्रभाव होता. आपल्या गुरूंचा ही आपल्यावर खूप प्रभाव असतो.
काळोखाची रात्र असावी त्यात साथ कंदिलाची मिळावी..
देव्हाऱ्यात वात तैवत राहावी…
माझ्या सर्व गुरूंना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी…!! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा… धन्यवाद….!!
______________________________________
गुरु पौर्णिमा भाषण क्रमांक-8
आज आपण सर्वजण गुरुपौर्णिमेनिमित्त एकत्र जमलेलो आहोत आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
गुरुन्ब्रम्हा गुरु विष्णू : गुरुदेवो महेश्वरायः । गुरु साक्षात परब्रम्ह, तस्मैयश्री गुरवे नमः ।।
गुरुपौर्णिमा हा अत्यंत आदर आणि कृतज्ञतेचा दिवस आहे. शतकानुशतके भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिलेल्या गुरू-शिष्य परंपरेचा हा उत्सव आहे. वेद व्यासांचे ज्ञान असो, गौतम बुद्धांच्या शिकवणी असोत किंवा आपल्या दैनंदिन शिक्षकांचे मार्गदर्शन असो, गुरुपौर्णिमा आपल्याला ज्ञान आणि शहाणपणाने आपले मार्ग प्रकाशित करणाऱ्यांचा सन्मान करण्याची आठवण करून देते. आपण हा शुभदिवस साजरा करत असताना, आपल्या गुरूंनी दिलेल्या धड्यांवर चिंतन करूया आणि त्यांनी दाखवलेल्या नीतिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया.
गुरु म्हणजे ज्ञानाचे पीठ या दिवशी गुरुपूजन करणे म्हणजे सत्याचे ज्ञानाचे पूजन करणे होय. गुरुसारखा पाठीराखा असला तर शिष्याला जीवनात यशस्वी मार्ग सापडतो. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा… एवढे बोलून आणि माझी भाषा संपवतो धन्यवाद
______________________________________
गुरुपौर्णिमा भाषण क्रमांक-9
आज गुरुपौर्णिमा आपण सर्वजण गुरुपौर्णिमेनिमित्त एकत्र जमलेलो आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे व माझे गुरुजन वर्ग तसेच माझ्या बाल मित्रांनो मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपण ऐकून घ्यावे ही नम्र विनंती
जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु. दरवर्षी गुरूंच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
भारतासह नेपाळ व जगभरात जिथ जिथे भारतीय राहतात तेथे साजरी केली जाते. हा दिवस शिष्यांसाठी गुरु बद्दल आभार व धन्यवाद प्रकट करण्याचा दिवस असतो. आषाढ पौर्णिमेचा हा दिवस महाभारताचे रचयीता महर्षी व्यास यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या जीवनामध्ये गुरुचे महत्व खूप मोठे आहे गुरू जीवनात जर नसतील तर आपले जीवन व्यर्थ आहे प्रत्येकाच्या जीवनात गुरु असतोच गुरुमुळेच आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो योग्य दिशा मिळते योग्य संस्कार होतात म्हणून गुरु हे खूप महत्त्वाचे असतात