माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेसाठी चित्रकला, शास्त्रीय कला, लोककला, एन.सी.सी. व स्काऊट गाईडचे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्याबाबत hsc art prastav online 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेसाठी चित्रकला, शास्त्रीय कला, लोककला, एन.सी.सी. व स्काऊट गाईडचे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्याबाबत hsc art prastav online 

संदर्भ १. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२०२/एसडी-२. दि.२४ नोव्हेंबर २०१७,

२. शासन निर्णय क्रमांक उमाशि-२०१५/प्र.क्र.२६२/एसडी-२. दि. २० डिसेंबर २०१८.

उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, संदर्भिय शासन निर्णय क. १ व २ नुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (ड. १०वी) फेब्रुवारी/मार्च परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्रकला, शास्त्रीय कला, लोककला, एन.सी.सी. व स्काऊट गाईड साठी वाढीव सवलतीचे गुण देण्यात येतात.

शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ या वर्षात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेसाठी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला, एन.सी.सी. व स्काऊट गाईड चे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने स्विकारावयाचे आहेत. त्यासाठी ऑनलाईन कलाप्रस्तावाबाबतची link ‘Art Praposals’ ही संबंधित शाळांच्या login मध्ये दि.१७/११/२०२५ पासून उपलब्ध करून देण्यात येईल.

सदर वाय आपल्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक तसेच सर्व संबंधित घटकांना लिखित स्वरूपात अवगत करून देण्याबाबतची पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

Related posts:

Leave a Comment