डाइनामाइटचे निर्माते व नोबेल पारितोषिकाचे जनक अल्फ्रेड नोबेल scientist alfred nobel
(२१ ऑक्टोबर, १८३३ १० डिसेंबर, १८९६)
डाइनामाइटचे निर्माते व नोबेल पारितोषिकाचे जनक
जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा ‘नोबेल पुरस्कार’ मिळविणे हे कुणाचे स्वप्न राहणार नाही! संपूर्ण आयुष्य आपल्या आवडीच्या क्षेत्रात समर्पित केल्यानंतर तो सन्मानाचा मुकुट मिळाल्यावर जीवन सार्थकी झाले असे वाटते.
अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला. नोबेल मात्र त्याच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने अजरामर झाला. नोबेल यांचे जीवन म्हणजे एका प्रयत्नवादी माणसाची कथाच आहे. स्वीडन, नॉर्वे, जर्मनी अशा कितीतरी देशांत त्यांनी आपले कारखाने चालवले. स्वीडनमधील कारखान्यात नायट्रोग्लिसरीन या स्फोटक पदार्थाचा वापर करताना प्रचंड स्फोट झाला आणि कारखाना नष्ट झाला. त्यात चारपाच माणसे मृत्युमुखी पडली. सरकारने पुन्हा कारखाना उभारण्यास परवानगी नाकारली. जर्मनीत देखील त्याचा कारखाना असाच नष्ट झाला. ‘नायट्रोग्लिसरीन’ या पदार्थावर सरकारने ठिकठिकाणी बंदी घातली. कारखाने बंद पडू लागले. कोणताही पदार्थ वाईट नसतो; मात्र वापर कशासाठी केला जातो यावर त्यांचा चांगलावाईट परिणाम अवलंबून असतो. स्फोटकपदार्थ विहिरीमध्ये सुरुंगासाठी वापरतात. त्यामुळे विहिरीतील कठिणातील कठीण दगड सहज फुटतात. त्यातून पाण्याचे झरे लागतात.
शांततेसाठी कार्य, साहित्य, कला यांबाबतही नोबेल यांना विज्ञानाइतकीच आस्था होती. या विविध क्षेत्रांतील भरीव कामगिरी करणाऱ्या जागतिक महत्त्वाच्या व्यक्तीचा योग्य बहुमान झाला पाहिजे, ही त्यांची इच्छा होती. याच दृष्टिकोनातून त्यांनी २७ नोव्हेंबर १८९५ रोजी आपले मृत्युपत्र लिहिताना नोबेल पारितोषिकाच्या स्थापनेची व्यवस्था केली.
डाइनामाइटच्या उत्पादनातून त्यांना जो नफा मिळाला, त्यांतील ९४ टक्के रक्कम या दानशूर शास्त्रज्ञाने या पारितोषिकासाठी राखून ठेवली.
शांततेसाठी कार्य, साहित्य, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र किंवा वैदयकीयशास्त्र आणि अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रांसाठी ही पारितोषिकं इसवी सन १९०१ सालापासून आजतागायत दिली जात आहेत. ‘नोबेल पारितोषिक’ या नावाने ओळखले जाणारे हे पारितोषिक अत्युच्च व अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाते.
सैन्यात अतिशय लोकप्रिय ठरलेल्या ‘डाइनामाइटचा’ शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला. या आधी नायट्रोग्लिसरीन हे स्फोटक द्रव्य म्हणून वापरले जायचे. पण तो स्थिर पदार्थ नसल्याने त्याचा कधीही स्फोट व्हायचा. अल्फ्रेड नोबेल यांनी नायट्रोग्लिसरीन, सल्फ्युरिक अॅसिड व सिलिका यांचे स्थिर मिश्रण शोधून काढून त्याला डाइनामाइट हे नाव दिले.
हवा तसा आकार देता येतो, तसेच हवे त्या वेळी त्याचा स्फोट घडवून आणता येतो. त्यामुळे सैन्यात ते लोकप्रिय झालेच; शिवाय खाणी आणि रस्ते तयार करण्याच्या कामांतही त्याचा उपयोग होऊ लागला.
काढून त्याला डाइनामाइट हे नाव दिले.
अल्फ्रेड नोबेल हे १० डिसेंबर, १८९६ रोजी स्वीडनमध्ये मृत्यू पावले, नोबेल अविवाहित होते. मात्र त्यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने ते अजरामर झाले. भारताने विविध क्षेत्रांत ‘नोबेल पुरस्कार’ जिंकून आपली छाप जागतिक पातळीवर उमटवली आहे. ‘नोबेल’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित झालेल्या भारतीय ह परदेशात असलेल्या व्यक्तींची माहिती खालीलप्रमाणे –
१) साहित्य :
इसवी सन १९१३ : रवींद्रनाथ टागोर ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहासाठी.
इसवी सन २००१ : डॉ. व्ही. एस. नायपॉल ‘बियाँड बिलीफ’ या ग्रंथासह त्यांच्या संपूर्ण साहित्यिक
कार्यासाठी
इसवी सन १९३० प्रा. चंद्रशेखर व्यंकट रामन प्रकाशाच्या विखुरणावरील संशोधनासाठी (रामन प्रभाव)
२) भौतिकशास्त्र :
इसवी सन १९८३: प्रा. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर तारांच्या उत्क्रांतीवरील संशोधनासाठी (चंद्रशेखर मर्यादा) शोधकरिता
३. वैदद्यकशास्त्र :
इसवी सन १९६८ : डॉ. हरगोविंद खुराना आनुवंशिक संकेतांच्या व्याख्येसाठी
४. अर्थशास्त्र :
इसवी सन १९९८ : डॉ. अमर्त्य सेन कल्याणकारी अर्थशास्त्र आणि दारिद्र्यावरील संशोधनासाठी
५. शांतता :
इसवी सन १९७९ : मदर तेरेसा गरिबांसाठी केलेल्या सेवाकार्यासाठी
इसवी सन २००७ : डॉ. राजेंद्र कुमार पचौरी पर्यावरणतज्ज्ञ आणि जागतिक हवामान संस्थेचे प्रमुख (IPCC चे प्रमुख म्हणून) हवामान बदलावरील जागरूकतेसाठी या सर्व विजेत्यांनी आपापल्या क्षेत्रात म हत्त्वपूर्ण योगदान देऊन भारताचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे. त्यांचे संशोधन आणि कार्य आजही जगभरातील लोकांना प्रेरणा देत आहे.











2 thoughts on “डाइनामाइटचे निर्माते व नोबेल पारितोषिकाचे जनक अल्फ्रेड नोबेल scientist alfred nobel ”